राशिद खानची शानदार गोलंदाजी   

चेन्नई : चेपॉक स्टेडियमवर चेन्नईच्या विरोधात गुजरातचा कर्णधार शुभमन गिल याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण नाणेफेकीवेळी युवा शुभमन गिल चाचपडल्याचे दिसला.  प्रथम फलंदाजी करताना चेन्नईच्या संघाने २० षटकांत २०६ धावा केल्या यावेळी ६ फलंदाज बाद झाले. रुतुराज गायकवाड याने ४६ धावा तर रचीन रवींद्र याने ४६ धावा केल्या. या दोघांची अर्धशतके हुकली. राशीद खान याने शानदार गोलंदाजी करत रचीन रवींद्र याला बाद केले. तर रुतुराज गायकवाड याला जॉन्सन याने वृद्धीमान सहाच्या गोलंदाजीवर बाद केले. अजिंक्य रहाणे १२ धावांवर बाद झाला. शिवम दुबे याला ५१ धावांवर राशीद खान याला बाद केले. 
 
शुभमन गिल याला गोलंदाजी घ्यायची होती, पण नाणेफेकीनंतर त्याने आधी फलंदाजी असा कॉल पंचांना सांगितला. काही क्षणात त्याला आपली चूक लक्षात आली, त्यानं तात्काळ गोलंदाजी असं कळवले शुभमन गिल याला चाचपडल्याचे पाहिल्यानंतर पंच आणि प्रतिस्पर्धी कर्णधार ऋतुराज गायकवाड यांनी स्मित हास्य केले. पंचांनी शुभमन गिल याचा गोलंदाजीचा निर्णय अंतिम ठरवला. आता चेन्नईचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. 
 मुंबईविरोधात झालेला पहिला सामना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप थकवणारा होता. क्षणाक्षणाला सामन्याचं चित्र बदलत होतं, पण आपल्याला त्याची सवय झाली आहे. सामना हातातून जाणं आणि त्यानंतर पुढच्याच क्षणात सामना आपल्या बाजूने झुकणं ही भावना जबरदस्त होती. आशा अटीतटीच्या सामन्यातून संघाची ताकद दिसून येते. प्लेईंग ११ मध्ये कोणताही बदल नाही, मागील सामन्यात खेळणारे ११ खेळाडूच मैदानावर उतरतील, असे शुभमन गिल नाणेफेकीनंतर म्हणाला. 

Related Articles