यंदा पावसाचे माप समाधानकारक   

तपमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता, डब्ल्यूएमओचा अहवाल 

 
नवी दिल्ली : यंदाच्या वर्षी मार्च ते मे दरम्यान तपमान सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे, असे जागतिक हवामान संघटनाने (डब्ल्यूएमओ) सांगितले आहे. २०२३-२४ वर्षातील एल निनो आतापर्यंतच्या पाच सर्वांतील गंभीर आहे. त्याचा प्रभाव कमी होत असला तरी येत्या काही महिन्यांत त्याचा जागतिक 
हवामानावर प्रभाव राहील.
 
संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे की, सध्याच्या अल निनोच्या परिस्थितीमुळे जगभरात विक्रमी तपमान आणि हवामानाच्या संदर्भातील घटना घडतील. युरोपियन युनियनच्या कोपर्निकस हवामान बदलानुसार, जानेवारीमध्ये जागतिक सरासरी तपमानाने संपूर्ण वर्षभर प्रथमच १.५ अंश सेल्सिअस उंबरठा ओलांडला आहे.
 

२०२३ पेक्षा यंदाचा मान्सून चांगला 

 
भारतातील घडामोडींचे निरीक्षण करणार्‍या शास्त्रज्ञांनी असे म्हटले आहे की, जून-ऑगस्टपर्यंत ला निनो परिस्थिती निर्माण झाल्यास २०२३ च्या तुलनेत 
यंदाचा मान्सूनचा पाऊस चांगला होईल.
 
एल निनो म्हणजे मध्य आणि पूर्व उष्णकटिबंधीय पॅसिफिक महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागात सतत तपमान वाढणे हे असे सरासरी दर दोन ते सात वर्षांनी होतो, आणि ते  सामान्यत: नऊ ते १२ महिने राहते.
 

अल निनो ६० टक्के कायम राहण्याची शक्यता 

 
पॅरिस करारातील १.५ अंश सेल्सिअस मर्यादा ओलांडणे म्हणजे तपमान वाढ होय. जागतिक हवामान संघटनेने म्हटले आहे की, मार्च ते मे या कालावधीत अल निनो कायम राहण्याची शक्यता ६० टक्के आहे. एप्रिल ते जून या काळात तटस्थ स्थिती असण्याची ८० टक्के शक्यता आहे. त्यात म्हटले आहे की, ला निना वर्षाच्या अखेरीस विकसित होण्याची शक्यता आहे, ही शक्यता सध्या अनिश्चित आहेत.
 

२०२३ आतापर्यंतचे सर्वांत उष्ण वर्ष 

 
डब्ल्यूएमओचे सरचिटणीस सेलेस्टे साऊलो म्हणाले, जून २०२३ पासून तपमानाने दर महिन्याला नवीन विक्रम केला आहे. २०२३ हे वर्ष आतापर्यंतचे सर्वांत उष्ण वर्ष म्हणून नोंदवले गेले आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, एल निनो ज्यावेळी निर्माण होतो, त्यानंतर त्याचा जागतिक हवामानावर जास्तीत जास्त प्रभाव त्याच्या दुसर्‍या वर्षी पासून दिसून येतो. यावेळी त्याचा प्रभाव २०२४ मध्ये दिसून येईल. जून २०२३ मध्ये एल निनो निर्माण झाला आणि नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान तो सर्वांत तीव्र होता.
 

Related Articles