E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
शिक्षण क्षेत्राचे आधारवड
Wrutuja pandharpure
17 Jul 2025
डॉ.संजय कंदलगावकर , निवृत्त प्राचार्य, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे
लोकमान्य टिळकांचे पणतू, टिळक घराण्याची जाज्वल्य इतिहासाची परंपरा चालवणारे माझे गुरू डॉ. दीपक टिळक यांना अभिवादन! आमच्या बीएमसीसीचे नामवंत माजी विद्यार्थी व ज्युदो या खेळाची पुण्यात पायाभरणी करणारे म्हणून त्यांचा लौकिक माहिती होताच! बीएमसीसीच्या नॅकच्या पहिल्या वहिल्या भेटीत डॉ. दीपक टिळक यांनी आवर्जून उपस्थित राहून कॉलेजला ‘अ’ श्रेणी मिळवून देण्यास हातभार लावला होता! नंतरही, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापक दिनाचे पाहुणे म्हणून त्यांनी माजी राष्ट्रपती डॉ. प्रणव मुखर्जी यांच्यासोबत उपस्थित राहून मार्गदर्शन केले होते!
डॉ. दीपक टिळक सरांचा माझा अधिक जवळचा परिचय मी टिमवीत आल्यानंतरचा आहे! टिमवीत अगदी पहिल्या दिवसापासून त्यांनी मला अतिशय सन्मानाने व आपुलकीने वागवले! कॉमर्स व व्यवस्थापन विभागाच्या अभ्यासक्रमातील बदलांबरोबरच शिक्षण पूरक प्रत्येक उपक्रमामध्ये सरांनी पाठिंबा दिला! त्यामुळेच बाहेरील तज्ज्ञांना व्याख्यानांसाठी निमंत्रित करणे, व्यापारी संघटनांबरोबर शैक्षणिक करार करणे, औद्योगिक सहली आयोजित करणे आम्हाला शक्य झाले आहे! सतत नावीन्याचा ध्यास घेणारे डॉ. दीपक टिळक सर प्रत्येक भेटीत प्रोत्साहन देत असत. आमच्या विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांची ते कौतुकाने दखल घेत असत.
टिमवी मधील सरांचा वावर म्हणजे आदरयुक्त दराराच होता! सरांच्या येण्या जाण्याच्या वेळा इतक्या नेमक्या असत, की घड्याळात वेळ लावून घ्यावी! सभागृहातील त्यांची आगमनाची चाल दिमाखदार तर असेच, शिवाय भाषणातून ते सहजगत्या सर्वांना आपलेसे करत! क्वचित प्रसंगी सभांमध्ये अस्वस्थता वा कामांचा ताण निर्माण झाल्यास अतिशय स्थितप्रज्ञतेने; पण मिश्किलतेने वातावरणात हलकेपणा निर्माण करत! टिमवीतील गणेशोत्सव असाच शानदार होत असतो ! त्या दिवसांमध्ये सकाळी आरतीला डॉ. दीपक टिळक सर आवर्जून उपस्थित राहात, टिमवीतील गणेश विसर्जन मिरवणूक दर्जेदार, शिस्तबद्ध प्रकारे होणारच!!! टिमवीतील त्यांचे वेगळेपण म्हणजे प्रत्येकाला वाढदिवसाला त्यांच्या सहीचे ग्रीटिंग मिळे !
२०१९ मध्ये लोकमान्य टिळकांच्या सांगली भेटीच्या शताब्दी समारंभात डॉ. दीपक टिळक व कुटुंबीय जातीने उपस्थित होतेच, सांगली शहरात निघालेल्या विशेष मिरवणुकीमध्ये अग्रभागी राहून सांगलीकरांना अभिवादन तर केलेच, संध्याकाळी झालेल्या ज्योतिष परिषद शताब्दी कार्यक्रमात त्यांनी केलेले भाषण लक्षणीय ठरले!डॉ. दीपक टिळक सरांचा ज्युदो खेळाच्या प्रसारामुळे जपान देशाशी अतूट असा संपर्क तर आलाच, टिमवीमध्ये जपानी भाषा व विद्यार्थ्यांचे आदान-प्रदान हे तर त्यांचे योगदानच; पण विशेषतः जपान सरकारकडून त्यांना मिळालेला किताब खूप महत्त्वपूर्ण आहे!
अलीकडे २०२२ मध्ये डॉ. दीपक टिळक यांनी लिहिलेल्या ७१ निवडक लेखांचे ’जाणिवा कर्मयोगाच्या’ हे पुस्तक श्री. रामदास नेहुलकर यांनी संपादन करून प्रकाशित केलेले आहे! यामधील लेखांमधून डॉ. दीपक टिळक यांनी टिळक घराण्याचा वारसा, त्यांची जडणघडण, आत्मकथनातून जपलेला हळुवारपणा, व्यक्तिचित्रणातून गुरुवर्य खानिवाले सर यांच्याबरोबरच त्यांच्या पत्नी, अम्मांबद्दल निर्व्याज मायेची पाखरण छान शब्दात व्यक्त केली आहे! टिमवीतील अनुभवपर्व हा लेख म्हणजे, त्यांची वाटचाल अतिशय प्रांजळपणे मांडली आहेच; परंतु, शिक्षण क्षेत्राला अतिशय पथदर्शी विचारांची दिशाच आहे. माझ्या करिअरच्या विशिष्ट प्रसंगी अगदी कोलमडून जाण्याची शक्यता असताना, डॉ. दीपक टिळक सरांनी मला मोठा आधार दिला आहे! नेहमीच अतिशय आदबीने बोलून, प्रोत्साहन दिलेले आहे!! सरांनी विश्वासाने आणि गुणग्राहकतेने मला बहाल केलेली टिमवीतील ’प्रोफेसर एमएरेटस्’ म्हणजे माझ्या आयुष्याची मर्मबंधातील ठेवच आहे! डॉ. दीपक टिळक यांना भावपूर्ण आदरांजली...
Related
Articles
भारतात अल्पसंख्याक सर्वात सुरक्षित : रिजिजू
20 Jul 2025
पुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी
25 Jul 2025
केरळमध्ये अडकलेले ब्रिटिशांचे एफ-३५ दुरुस्त झाले
21 Jul 2025
महापालिका निवडणूक आप स्वतंत्र लढणार
21 Jul 2025
दाल में कुछ काला है !
24 Jul 2025
उन्नतीचा संघर्षपूर्ण विजय; सिंधूचा पराभव
25 Jul 2025
भारतात अल्पसंख्याक सर्वात सुरक्षित : रिजिजू
20 Jul 2025
पुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी
25 Jul 2025
केरळमध्ये अडकलेले ब्रिटिशांचे एफ-३५ दुरुस्त झाले
21 Jul 2025
महापालिका निवडणूक आप स्वतंत्र लढणार
21 Jul 2025
दाल में कुछ काला है !
24 Jul 2025
उन्नतीचा संघर्षपूर्ण विजय; सिंधूचा पराभव
25 Jul 2025
भारतात अल्पसंख्याक सर्वात सुरक्षित : रिजिजू
20 Jul 2025
पुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी
25 Jul 2025
केरळमध्ये अडकलेले ब्रिटिशांचे एफ-३५ दुरुस्त झाले
21 Jul 2025
महापालिका निवडणूक आप स्वतंत्र लढणार
21 Jul 2025
दाल में कुछ काला है !
24 Jul 2025
उन्नतीचा संघर्षपूर्ण विजय; सिंधूचा पराभव
25 Jul 2025
भारतात अल्पसंख्याक सर्वात सुरक्षित : रिजिजू
20 Jul 2025
पुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी
25 Jul 2025
केरळमध्ये अडकलेले ब्रिटिशांचे एफ-३५ दुरुस्त झाले
21 Jul 2025
महापालिका निवडणूक आप स्वतंत्र लढणार
21 Jul 2025
दाल में कुछ काला है !
24 Jul 2025
उन्नतीचा संघर्षपूर्ण विजय; सिंधूचा पराभव
25 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर