बीएसई इमारत बॉम्बने उडवून देण्याची धमकी   

मुंबई : मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) इमारत बॉम्बने उडवून देण्यात येणार असल्याचा ईमेल आला होता. या परिसराची कसून तपासणी केल्यानंतर तो बनावट असल्याचे निष्पन्न झाले, असे पोलिसांनी मंगळवारी सांगितले.
 
रविवारी बीएसईच्या एका कर्मचार्‍याला दक्षिण भारतातील एका राजकीय नेत्याचे नाव असलेल्या ईमेल आयडीवरून ईमेल आला होता. यामध्ये बीएसई इमारतीत चार आरडीएक्स आयईडी लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच, सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास स्फोट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले. रविवारी कार्यालय बंद असल्याने बीएसईच्या कर्मचार्‍याला सोमवारी याबाबतची माहिती मिळाली. यानंतर, त्यांनी अधिकार्‍यांना याबाबत सांगितले. अधिकार्‍यांनी मुंबई अधिकार्‍यांशी संपर्क साधत याची माहिती दिली.

Related Articles