E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
लोकाभिमुख, मार्गदर्शक असे व्यक्तिमत्व हरपले : मुख्यमंत्री
Samruddhi Dhayagude
16 Jul 2025
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
पुणे : केसरीचे विश्वस्त आणि लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला. 'लोकमान्य टिळक यांचा महाराष्ट्रातील समाजकारणातील विविधांगी क्षेत्रातील वारसा समर्थपणे चालविणारे लोकाभिमुख, मार्गदर्शक असे व्यक्तिमत्व असलेले दीपक टिळक यांच्या निधनामुळे अनेक सामाजिक संस्थांचा आधारस्तंभ हरपला आहे अशा शोक भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकमान्य टिळक आणि त्यांचे सुपुत्र दिवंगत जयंत टिळक यांच्याकडून मिळालेला वारसा डॉ. दीपक टिळक यांनी समर्थपणे चालविला. ते राजकारणात फारसे रमले नाहीत. पण लोकमान्य टिळक यांनी पाया घातलेल्या दैनिक केसरी तसेच शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्य त्यांनी तितक्याच जबाबदारीने सांभाळले. यातून ते कित्येक सामाजिक संस्था, संघटना, विश्वस्त मंडळांचे आधारस्तंभ ठरले. त्यांच्या पुढाकाराने अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील उपक्रमांना समाजातून पाठबळ मिळत राहिले. डॉ. टिळक हे व्यवस्थापन आणि पत्रकारिता क्षेत्रातील अभ्यासक, संशोधक राहिले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक होतकरू युवकांनाही या क्षेत्रातील संशोधनाची प्रेरणा मिळाली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात भरीव असे कार्य केले आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच डॉ. दीपक टिळक यांच्या निधनामुळे राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील एक मार्गदर्शक असे उत्तुंग व्यक्तिमत्व हरपले आहे. ही या क्षेत्रासाठी हानी आहे. टिळक यांच्या निधनामुळे त्यांच्या परिवारावर, विविध संस्था, संघटना आणि सामाजिक उपक्रमांशी निगडित कार्यकर्ते यांच्यावर दुःखाचा आघात झाला आहे. या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांना हे दुःख सहन करण्याची ताकद मिळो, अशी ईश्वराला प्रार्थना करतो. डॉ. दीपक टिळक यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थना करतो आणि त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही व्यक्त केल्या शोकभावना
जपानी भाषेच्या प्रसारासाठी डॉ. दीपक टिळक यांनी केलेल्या कार्याची जपान सरकारनेही दखल घेतली होती. तसेच, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांचे कार्य हे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी होते. ते एक विचारवंत, कुशल प्रशासक, संवेदनशील पत्रकार आणि समर्पित समाजसेवक होते. त्यांच्या जाण्याने पुणे शहराच्या सार्वजनिक जीवनात पोकळी निर्माण झाली आहे अशी भावना अजित पवारांनी बोलून दाखवली.
लोकमान्यांचा वारसा पोरका झाला : उपमुख्यमंत्री शिंदे
संघर्षमय काळातही नीतीमूल्यांची कसोशीने पाठराखण करणारे ज्येष्ठ संपादक-पत्रकार ‘केसरी’कार दीपक टिळक यांच्या निधनाने मराठी संस्कृतीने खूप काही गमावले आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी पत्रकारितेतला एक तेजस्वी कालखंड अस्ताला गेला असेच म्हणावे लागेल. केसरी’चे विश्वस्त संपादक, लोकशिक्षणाचा वसा घेतलेले शिक्षणतज्ञ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु, तळमळीचा लोकशिक्षक अशी चौफेर कामगिरी त्यांनी केली. लोकमान्य टिळकांचे पणतू असलेल्या श्री. टिळक यांनी आपल्या मिळालेला पिढीजाद वारसा पुढे नेला. भारतीय स्वातंत्र्यासाठी अस्तित्त्व पणाला लावून लोकमान्य टिळकांचा ‘केसरी’ लढला होता. स्वातंत्र्यानंतर त्याच ‘केसरी’ वृत्तपत्राने लोकशिक्षणाचा वसा घेतला.
दीपक टिळक यांच्यामुळे शिक्षणाला परिस्थितीमुळे वंचित झालेल्या अनेकांना आयुष्याच्या उत्तरार्धातही पदवी मिळवण्याचे स्वप्न साकारता आले, ही फार मोठी कामगिरी आहे. पत्रकारांच्या पिढ्या त्यांनी घडवल्या. शिक्षण आणि पत्रकारिता हे प्रबोधनाचेच दोन मार्ग आहेत. श्री. टिळक यांनी दोन्ही मार्गांवर मोठी कामगिरी बजावली. त्यांचे कार्यकर्तृत्व पुढील पिढ्यांसाठी नेहमीच दीपस्तंभासारखे दिशादर्शक राहील, यात शंका नाही. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि महाराष्ट्रभर पसरलेल्या शिष्यगणांच्या दु:खात मी सहभागी आहे. शिवसेनेच्या वतीने मी त्यांना आदरपूर्वक श्रध्दांजली वाहतो. ओम शांती.
--
लोकमान्य टिळक यांचे पणतू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती व केसरीचे विश्वस्त-संपादक डॉ. दीपक टिळक यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती प्रदान करो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो. ॐ शांती
- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
‘केसरी’चे विश्वस्त संपादक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू आणि लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपकजी टिळक यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
- रक्षा खडसे, खासदार
लोकमान्य टिळक यांचे पणतू आणि 'केसरी'चे विश्वस्त-संपादक डॉ. दीपक टिळक यांच्या निधनाचे दुःखद वृत्त अत्यंत वेदनादायक आहे.डॉ. टिळक यांनी वडिलांकडून मिळालेला राजकारणाचा आणि आईकडून मिळालेला समाजकारणाचा वारसा अत्यंत जबाबदारीने आणि उल्लेखनीय कार्यातून नेहमीच जपला. शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक कार्य या क्षेत्रांमध्ये त्यांनी भरीव योगदान दिले. ते 'टिळक महाराष्ट्र विद्यापीठा'चे विद्यमान कुलपती म्हणून कार्यरत असताना, या विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रांतील उपक्रमांना त्यांनी नेहमीच भरभरून प्रोत्साहन आणि सहाय्य केले.डॉ. दीपक टिळक यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
- सुप्रिया सुळे, खासदार
'केसरी'चे विश्वस्त-संपादक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती व लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. शैक्षणिक, सामाजिक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती प्रदान करो. ॐ शांती.
- पियुष गोयल, खासदार
'केसरी'चे विश्वस्त संपादक आणि लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचं निधन झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक कार्यात त्यांनी दिलेलं योगदान विसरता येणार नाही. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो! भावपूर्ण श्रद्धांजली!
- रोहित पवार
लोकमान्य टिळक यांचे पणतू आणि 'केसरी'चे विश्वस्त-संपादक डॉ. दीपक टिळक यांच्या निधनाचे दुःखद वृत्त अत्यंत वेदनादायक आहे. डॉ. टिळक यांनी वडिलांकडून मिळालेला राजकारणाचा आणि आईकडून मिळालेला समाजकारणाचा वारसा अत्यंत जबाबदारीने आणि उल्लेखनीय कार्यातून नेहमीच जपला. शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक कार्य या क्षेत्रांमध्ये त्यांनी भरीव योगदान दिले. ते 'टिळक महाराष्ट्र विद्यापीठा'चे विद्यमान कुलपती म्हणून कार्यरत असताना, या विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रांतील उपक्रमांना त्यांनी नेहमीच भरभरून प्रोत्साहन आणि सहाय्य केले. डॉ. दीपक टिळक यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
- शरद पवार
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती, केसरी वृत्तपत्राचे विश्वस्त संपादक आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांच्या निधनाची वार्ता दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
त्यांच्या निधनाने एक विचारवंत, कुशल प्रशासक, संवेदनशील पत्रकार आणि समाजासाठी समर्पित व्यक्तिमत्त्व हरपलं आहे. शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक कार्य या क्षेत्रांतील त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे. जपानी भाषेच्या प्रसारासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल जपान सरकारनंही घेतली होती. 'केसरी'च्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रभक्ती आणि मूल्याधिष्ठित विचारांचं जतन केलं. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांची भूमिका लक्षणीय होती. टिळक कुटुंबाच्या दुःखात मी सहभागी आहे. डॉ. टिळक यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच प्रार्थना!
- छगन भुजबळ
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. दिपक टिळक यांच्या निधनाने आपण शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक कार्यात मोलाचे योगदान देणारे एक व्यक्तिमत्त्व गमावले, अशी भावना जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.
आपल्या शोकसंदेशात मंत्री विखे पाटील म्हणाले की, लोकमान्य टिळकांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे प्रयत्न डॉ. दिपक टिळक यांनी सातत्याने केले. लोकमान्यांनी सुरू केलेल्या ‘केसरी’ या वृत्तपत्र समूहाचे विश्वस्त म्हणून त्यांनी वृत्तपत्राची परंपरा जपत राष्ट्रभक्तीच्या विचारांची मांडणी केली. सामाजिक मूल्यांचा संदेश त्यांनी पत्रकारितेमार्फत दिला.
टिळक कुटुंबीयांचा सामाजिक वारसा पुढे नेताना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला नवा आयाम देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य डॉ. दिपक टिळक यांच्या संकल्पनेतून घडले. अनेक विद्यापीठांत होणाऱ्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली आणि त्यांच्या नावीन्यपूर्ण दृष्टिकोनाचा अनुभव घेता आला.त्यांच्या निधनाने सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रातील एक चिंतनशील व्यक्तिमत्त्व आपल्यातून गेले, ही मोठीच हानी. डॉ. दिपक टिळक यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
- राधाकृष्ण विखे-पाटील
केसरीचे विश्वस्त संपादक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती तथा लोकमान्य टिळक यांचे वंशज डॉ. दीपक टिळक यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. शिक्षण, पत्रकारिता यांसह सामाजिक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान प्रेरणा देत राहील. भावपूर्ण श्रद्धांजली...
- धनंजय मुंडे
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती, ‘दैनिक केसरी’चे विश्वस्त संपादक आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पणतू डॉ.दिपक जयंतराव टिळक यांचे निधन झाल्याचे समजून दु:ख झाले. मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परमेश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो, अशीही प्रार्थना.
- सी. पी. राधाकृष्ण,राज्यपाल
दीपक टिळक यांच्या निधनाची वार्ता कळली. आपणा सर्वांच्या दुःखात सहभागी. टि. म. वि. मुळे त्यांचे भाषण ऐकण्याचे योग आले. एक ऋजू पण कणखर व्यक्तिमत्व असा ठसा उमटला मनावर. आमच्यासाठी ते एका व्यक्तीचे निधन नसून तो इतिहासाला जोडणारा झरोका, एका थोर पुरुषाच्या वारश्याची पालखी वाहणारे ते भोई. आपण लोकमान्यांना पाहिले नाही मात्र दीपक टिळकांना पाहिले. भावपूर्ण श्रद्धांजली.
- विद्या बोकील (कवयित्री)
लोकमान्य टिळकांचे पणतू व 'केसरी' चे विश्वस्त संपादक आदरणीय डॉ. दीपक टिळक यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दुःख झाले.लोकमान्यांचा राष्ट्रवादी पत्रकारितेचा समृद्ध वारसा डॉ. दीपक टिळक यांनी समर्थपणे पुढे नेला. तसेच, पुण्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान अमूल्य आहे. अजातशत्रू असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. डॉ. दीपक टिळक यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो. त्यांच्या कुटुंबीय व आप्तांच्या दुःखात मी सहभागी आहे.ओम् शांती!
- चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री, राज्य सरकार
लोकमान्य टिळक यांचे पणतू, ‘केसरी’ चे विश्वस्त - संपादक तथा टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॅा. दीपक जयंतराव टिळक यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्या रूपाने एक सुसंस्कृत आणि बहुश्रुत व्यक्तिमत्व हरपले. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. टिळक परिवारावर ओढवलेल्या या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, ही प्रार्थना.
- चंद्रकांत पाटील
डॉ. दीपक टिळक यांनी टिळक घराण्याचा वारसा सर्मथपणे चालवत शिक्षण, पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात अत्यंत मोलाचे योगदान दिले. लोकमान्य टिळक यांची विचारधारा आणि मूल्यांची परंपरा त्यांनी कृतिशीलतेने पुढे नेली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक उन्नतीमध्ये त्यांची भूमिका अत्यंत मोलाची ठरली. दैनिक केसरीचे विश्वस्त संपादक म्हणून पत्रकारीतेसह विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांना त्यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिले.डॉ. दीपक टिळक यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून, टिळक कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.
- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
Related
Articles
डोंबिवलीत कारखान्याला आग
24 Jul 2025
डीजे बंदीचा आदेश सार्वजनिक मिरवणुकांनाही लागू
25 Jul 2025
वडगावशेरी भागातील पाणीपुरवठ्याच्या वेळेत बदल
26 Jul 2025
धान्यापासून इथेनॉल निर्मितीस मान्यता
27 Jul 2025
एअर इंडियाचे विमान धावपट्टीवरून घसरले
22 Jul 2025
आता विजय भारताचाच
26 Jul 2025
डोंबिवलीत कारखान्याला आग
24 Jul 2025
डीजे बंदीचा आदेश सार्वजनिक मिरवणुकांनाही लागू
25 Jul 2025
वडगावशेरी भागातील पाणीपुरवठ्याच्या वेळेत बदल
26 Jul 2025
धान्यापासून इथेनॉल निर्मितीस मान्यता
27 Jul 2025
एअर इंडियाचे विमान धावपट्टीवरून घसरले
22 Jul 2025
आता विजय भारताचाच
26 Jul 2025
डोंबिवलीत कारखान्याला आग
24 Jul 2025
डीजे बंदीचा आदेश सार्वजनिक मिरवणुकांनाही लागू
25 Jul 2025
वडगावशेरी भागातील पाणीपुरवठ्याच्या वेळेत बदल
26 Jul 2025
धान्यापासून इथेनॉल निर्मितीस मान्यता
27 Jul 2025
एअर इंडियाचे विमान धावपट्टीवरून घसरले
22 Jul 2025
आता विजय भारताचाच
26 Jul 2025
डोंबिवलीत कारखान्याला आग
24 Jul 2025
डीजे बंदीचा आदेश सार्वजनिक मिरवणुकांनाही लागू
25 Jul 2025
वडगावशेरी भागातील पाणीपुरवठ्याच्या वेळेत बदल
26 Jul 2025
धान्यापासून इथेनॉल निर्मितीस मान्यता
27 Jul 2025
एअर इंडियाचे विमान धावपट्टीवरून घसरले
22 Jul 2025
आता विजय भारताचाच
26 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता
2
महागाईवाढ मंदावली? (अग्रलेख)
3
‘डॉन’ चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रा बारोट यांचे निधन
4
मंथरेच्या सल्ल्याने कैकयी दशरथावर रुसली!
5
बँकिंग क्षेत्राची स्थिती मजबूत
6
वाचक लिहितात