गोव्याच्या राज्यपालपदी गजपती राजू   

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री  पी.ए. गजपती राजू यांची सोमवारी गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली तर जम्मू- काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता यांची लडाखचे नायब राज्यपाल म्हणून  नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील भाजपचे ज्येष्ठ नेते आशीम कुमार घोष हे हरयानाचे नवे राज्यपाल असतील, असे एका अधिकृत पत्रकात म्हटले आहे. आंध्र प्रदेशातील तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) ज्येष्ठ नेते राजू हे गोव्याचे राज्यपाल म्हणून पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची जागा घेतील. पिल्लई यांनी १५ जुलै २०२१ रोजी गोव्याच्या राज्यपाल पदाची सूत्रे हाती घेतली होती. राजू यांनी केंद्रात आणि आंध्र प्रदेश सरकारमध्ये मंत्रिपदही भूषवले आहे. 

Related Articles