संकट काळात जो खंबीरपणे काम करतो तोच खरा नेता   

फडणवीस यांच्याकडून मोहोळ यांचे कौतुक

पुणे : भाजप हा नेहमीच कार्यकर्ता यांना वेगवेगळ्या संधी देत असतो. कार्यकर्ता याची क्षमता पाहून त्याला वेगवेगळी संधी दिली जाते. भाजप पक्ष हा पुढील पिढीदेखील दूरदृष्टीने तयार करत असतो. खासदार  मुरलीधर मोहोळ हे त्यांना दिलेले काम झोकून देऊन करण्याचा नेहमी प्रयत्न करतात. राजकीय आणि प्रशासकीय कामात ते कुस्ती परंपराप्रमाणे कौशल्यपूर्वक एकाचवेळी विविध कामे करतात. कोरोनात त्यांनी उत्कृष्ट काम केले. संकटात जो काम करतो तो खरा नेता असतो. त्याचमुळे त्यांची नवी ओळख निर्माण झाली, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
 
केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक विभाग राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने २४ तास जनसंपर्क कार्यालय शुभारंभ व प्रथम वर्ष कार्यअहवाल प्रकाशन तसेच कोरोना काळातील अनुभव कथन करणारे प्रथम माणूस पुस्तक प्रकाशन या कार्यक्रमांचे आयोजन शनिवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले. 
 
यावेळी भारतीय जनता पक्ष प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास विभाग राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार मेधा कुलकर्णी, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, भारतीय जनता पक्ष, पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, आमदार हेमंत रासने, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार भीमराव तापकीर, आमदार सुनील कांबळे, आमदार योगेश टिळेकर, माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी आमदार जगदीश मुळीक, भाजप युवा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, सुभाष जगताप, शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरे, संजय भोसले, श्रीनाथ भिमाले, गणेश बीडकर, राहुल भंडारे, गणेश कळमकर, राजेंद्र शिळीमकर, दीपक पोटे, रवींद्र साळेगावकर, बापू मानकर, वर्षा तापकीर, मोनिका मोहोळ  उपस्थित होते. 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मध्यंतरी एक बातमी पाहिली की, देवेंद्र फडणवीस यांचे पुण्यावर विशेष प्रेम असून ते नऊ वेळा पुण्यात आले, पण असे मी काही मोजत नाही. मुरलीधर मोहोळ त्यांचे कार्यालयाचे उद्घाटन आणि वर्षपूर्ती कार्याचे अहवाल प्रकाशन करत आहे ही महत्वाची गोष्ट आहे. देशात कोणत्याही खासदाराचे अशाप्रकारे नागरिकांसाठी २४ तास कार्यालय पाहिजे. स्वर्गीय गिरीश बापट यांनी चांगले नेतृत्व पुण्याचे केले. त्यांच्या नंतर सर्व वरिष्ठ नेत्यांनी एकमुखाने खासदार पदासाठी मुरलीधर मोहोळ यांचे नाव ठरवले. मोहोळ निवडून आल्यावर त्यांना देशातील महत्त्वाचे खाते काम करण्यासाठी मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत ते काम करत आहे. त्यांची शिस्त कडक आहे. तेथील पद हे जबाबदारीचे असून ते उपभोगता येत नाही. अमित शहा यांनी मला खासगी गप्पात सांगितले की, मुरलीधर मोहोळ चांगला नेता असून अभ्यासू असल्याने त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे. त्यामुळे त्यांचे काम चांगल्याप्रकारे सुरू आहे. देशभरात मुरलीधर मोहोळ फिरून विविध दिलेली कामे जबाबदारीने पूर्ण करत आहे. सातत्याने विविध ठिकाणी फिरून दांडगा जनसंपर्क देखील ते करत आहे. तसेच पुण्याचे केंद्राकडे असलेले विषय सातत्याने पाठपुरावा करतात त्यामुळे जागृत प्रतिनिधी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. लोकांना वन स्टॉप सुविधा त्या नवीन कार्यालय माध्यमातून देत आहे. भाजपच्या परंपरेला साजेल असा कार्य अहवाल त्यांनी सादर केला आहे. त्यांची आमदारकी चुकली असली तरी त्यांचा कामाची व्याप्ती ही मोठी असल्याने ते खासदार झाले आहेत. सूत्रसंचालन राजेश पांडे यांनी केले.

Related Articles