बेकायदा वास्तव्य करणार्‍या चार बांगलादेशी नागरिकांना अटक   

रांजणगाव, (वार्ताहर) : कारेगाव, ता.शिरुर येथे बेकायदेशीररित्या वास्तव्य करणार्‍या चार बांगलादेशी नागरिकांविरोधात रांजणगाव पोलिसांनी दहशतवाद विरोधी शाखेच्या मदतीने मोठी कारवाई केली आहे. पकडलेल्या बांगलादेशीचौघांकडे कोणतेही वैध प्रवासी कागदपत्र नसताना बनावट आधारकार्डाच्या आधारे भारतात प्रवेश करून दोन वर्षांपासून चौघांनी  कारेगाव येथे वास्तव्य केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.
 
कमरोल रमजान शेख (वय-३२, रा.जिल्हा-खोलना, बांगलादेश), अकलस मजेद शेख (वय-३९, रा. जिल्हा- गोपालगंज, बांगलादेश), मोहम्मद अब्दुल्ला मलिक (वय-३५, रा. जिल्हा- नोडाइल, बांगलादेश) व जाहिद अबूबकर शेख (वय-३०, रा. जिल्हा-नोडाइल, बांगलादेश) या चार बांगलादेशी नागरिकांना दहशतवादी विरोधी पथकाने व रांजणगाव पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत अटक करून ताब्यात घेतले आहे. 
 
सर्व चारही बांगलादेशी हे सध्या शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे वास्तव्यास होते. असे चौकशी दरम्यान उघड झाले आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे आणि दहशतवाद विरोधी विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांच्या पथकाने केली.

Related Articles