नऊ कोटीच्या रक्तचंदन चोरी प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक   

पिंपरी : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कंटेनरमधून तब्बल ९ कोटींच्या रक्तचंदनाची तस्करी करणार्‍या टोळीतील फरार मुख्य सूत्रधारास अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे शाखेच्या पथकाने नेरुळ, नवी मुंबई येथून अटक केली आहे. यासोबतच त्याच्या साथीदारालाही अटक करण्यात आली आहे.राजेंद्र विठ्ठल शिंदे (वय ४३, रा. वाशी, नवी मुंबई) असे अटक केलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे. तर त्याच्यासोबत कल्पेश सिंग असे खोटे नाव सांगणार्‍या तौसिफ रियाज जमादार (रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) यालाही अटक करण्यात आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी नवी मुंबईच्या नेरुळ परिसरात सापळा रचून दोघांनाही अटक केली. अटक करण्यात आलेल्या दोघांना पुढील तपासासाठी पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहआयुक्त शशिकांत महावरकर, उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या नेतृत्वाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने केली.

Related Articles