हिंदू व्यावसायिकाची बांगलादेशात हत्या   

ढाका : हिंदू व्यावसायिक लाल चंद सोहाग यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर हल्लेखोर त्यांच्या मृतदेहावर नाचले. ढाका येथील मिटफोर्ड रूग्णालयाजवळील सर सलीमुल्ला वैद्यकीय महाविद्यासमोर ही घटना घडली. या घटनेची चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर बांगलादेशातील हिंदू धर्मीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 
 
सोहाग हे ’सोहाना मेटल’ नावाचे भंगाराचे दुकान चालवायचे. परिसरातील महमूदुल हसन मोहिन आणि सरवर हुसेन टीटू यांनी सोहाग यांना त्यांच्या व्यवसायात ५० टक्के हिस्सा किंवा खंडणी देण्याची मागणी केली. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून आरोपी खंडणीसाठी सोहाग यांना त्रास देत होते. 

 

Related Articles