वेदांता कंपनीकडून भाजपला ९७ कोटी रुपयांची देणगी   

नवी दिल्ली : वेदांता कंपनीचे सर्वेसर्वा, अब्जाधीश उद्योगपती आणि खाणसम्राट अनिल अग्रवाल यांनी भाजपसह प्रमुख पक्षांना भरघोस देणग्या दिल्याचे उघड झाले आहे. त्यात भाजपला मार्च २०२५ अखेर ९७ कोटी रुपयांची सर्वाधिक देणगी दिली. 
 
देणग्या सर्वस्वी राजकीय असून त्या व्यवस्थापन आणि ब्रँड मुक्त अशा विविध खर्चासाठी देणग्या दिल्या असल्याचे लंडन येथील वेदांता रिसोर्सने तपशीलात नमूद केले आहे.  २०२४ ते २०२५ दरम्यान राजकीय देणग्यांची रकम १५७ कोटी होती. यंदा त्यात ९७ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. भाजप पाठोपाठ काँग्रेसला १० कोटीची देणगी दिली. 
 
२०२४ ते २०२५ अखेर भाजपला ९७ कोटी दिले. त्यापूर्वीच्या वर्षात २०२४ अखेर २६ कोटी दिले होते. बिजू जनता दलाला  २५ कोटी त्यापूर्वी २०२४ अखेर ५ कोटी दिले. झारखंड मुक्ती मोर्चाला यंदा २० कोटी तर २०२४ अखेर ५ कोटी आणि अखिल भारतीय काँग्रेस पक्षाला यंदा १० कोटी तर त्यापूर्वी २०२४ अखेर ४९ कोटी रुपयांची देणगी दिली होती. या संदर्भातील वार्षिक अहवाल कंपनीकडून प्रकाशित आला. त्यात ही माहिती उघड झाली. अनिल अग्रवाल यांची तकंपनी राजकीय पक्षांना मोठी देणगी देणारी ठरली आहे. २०२२ ते २०२३ अखेर १५५ कोटी रुपये दिले होते. 
 

Related Articles