E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
वॉशिंग्टन सुंदरमुळे इंग्लंडचा डाव कोसळला
Wrutuja pandharpure
14 Jul 2025
लॉर्ड्स
: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय युवा गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरने ४ महत्त्वपुर्ण बळी घेतले. त्याच्या या कामगिरीमुळे इंग्लंडच्या संघाचा डाव कोसळला. इंग्लंडच्या संघाने ६२.१ षटकांत १९२ धावा केल्या. यावेळी सर्व फलंदाज गमावले.
सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे भारतीय संघ गोलंदाजी करत आहे. पहिल्या डावात इंग्लंडने 387 धावा केल्या, तर टीम इंडियाही पहिल्या डावात ३८७ धावा करत सर्वबाद झाली. यासह पहिल्या डावातील दोन्ही संघांची धावसंख्या बरोबरीत आहे. तिसर्या दिवसाच्या अखेरीस इंग्लंडचा संघ फलंदाजीला उतरत त्यांनी २ धावा केल्या आहेत.
जो रूटनंतर वॉशिंग्टन सुंदरने जेमी स्मिथला क्लीन बोल्ड केलं आहे. जेमी स्मिथने संपूर्ण मालिकेत आक्रमक फलंदाजी करत भारतीय संघाला फार त्रास दिला आहे. पण आता दुसर्या डावात सुंदरने स्मिथला मैदानावर टिकू दिलं नाही. इंग्लंडचा निम्मा संघ यासह तंबूत परतला आहे. इंग्लंडचा सर्वात अनुभवी फलंदाज जो रूट वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला आहे. जो रूट गुडघ्यावर बसून फटका खेळायला गेला आणि चेंडू जाऊन स्टम्पवर आदळला. यासह भारताला सेट झालेल्या रूटचा बळी मिळाला. तर इंग्लंडने आतापर्यंत ५ बाद १५८ धावा केल्या आहेत.
इंग्लंड संघाने लंचब्रेकपर्यंत ४ बाद ९८ धावा केल्या आहेत. भारताच्या गोलंदाजांनी दुसर्या डावात भेदक गोलंदाजी करत इंग्लिश संघाला धावा करण्याची फारशी संधी दिली नाही. तर सिराज, आकाशदीप आणि नितीश रेड्डी यांनी कमालीच्या गोलंदाजीच्या जोरावर बळी घेतले. पहिल्या डावात एकही विकेट न मिळवल्याने आकाशदीप चर्चेचा विषय ठरला होता. पण दुसर्या डावात त्याने २२ व्या षटकात हॅरी ब्रूकला क्लीन बोल्ड करत संघाला मोठी विकेट मिळवून दिली. ब्रूकने आकाशच्या आधीच्या षटकात दोन चौकार आणि १ षटकार लगावत धुलाई केली होती. आकाशने पुढील षटकात बोल्ड करत घेतला बदला. नितीश रेड्डीने १६व्या षटकात जॅक क्रॉलीला झेलबाद करत संघाला तिसरी विकेट मिळवून दिली. भारताच्या सर्व गोलंदाजांनी चौथ्या दिवशी कमालीची गोलंदाजी केली आहे. नितीशच्या गोलंदाजीवर गलीमध्ये यशस्वी जैस्वालने शानदार झेल टिपला.
सिराजने डकेटनंतर ऑली पोपला बाद करत संघाला बळी मिळवून दिली आहे. सिराजने १२ व्या षटकातील अखेरचा टाकलेला चेंडू पोपच्या पॅडवर जाऊन आदळला आणि संघाने विकेटची अपील केली. पण मैदानावरील पंचांनी बाद दिलं नाही, यानंतर गिलशी चर्चा करून सिराजने रिव्ह्यू घेतला, ज्याचा निर्णय भारताच्या बाजूने लागला आणि संघाला विकेट मिळाली.भारताला चौथ्या दिवशी सुरूवातीला पहिली विकेट मिळाली आहे. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर आक्रमक फलंदाजी करणार्या डकेटला सिराजने जसप्रीत बुमराहकरवी झेलबाद केलं आहे. यासह डकेट १२ धावा करत बाद झाला.
भारतीय खेळाडूंनी चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यापासून जॅक क्रॉलीला पूर्णपणे घेरून ठेवलं आहे आणि सातत्याने मोठमोठ्याने बोलत हुर्यो उडवली जात आहे. क्रॉलीवर देखील याचा दवाब दिसून येत आहे आणि त्याला अद्याप चौथ्या दिवशी एकही धाव काढता आलेली नाही. दुसर्याच षटकात बुमराह गोलंदाजीला आला आणि त्या षटकातील अखेरचा चेंडू क्रॉलीच्या हातावर जाऊन आदळला की त्याच्या हातातून बॅट निसटली.
Related
Articles
निमिषा प्रियाची सुटका होणार, ख्रिश्चन धर्मोपदेशकाचा दावा
22 Jul 2025
सर्पमित्रांना ओळखपत्रासह १० लाखांच्या अपघात विम्याचे कवच
25 Jul 2025
ट्रम्प बाबतच्या फतव्याने मौलवींनी जमवले ३५० कोटी
23 Jul 2025
बिहारमध्ये ५ लाख ७६ हजार नवे मतदार
19 Jul 2025
लोकमान्यांचा षष्ठ्यद्बिपूर्ती समारंभ
23 Jul 2025
चहाची निर्यात वाढली
20 Jul 2025
निमिषा प्रियाची सुटका होणार, ख्रिश्चन धर्मोपदेशकाचा दावा
22 Jul 2025
सर्पमित्रांना ओळखपत्रासह १० लाखांच्या अपघात विम्याचे कवच
25 Jul 2025
ट्रम्प बाबतच्या फतव्याने मौलवींनी जमवले ३५० कोटी
23 Jul 2025
बिहारमध्ये ५ लाख ७६ हजार नवे मतदार
19 Jul 2025
लोकमान्यांचा षष्ठ्यद्बिपूर्ती समारंभ
23 Jul 2025
चहाची निर्यात वाढली
20 Jul 2025
निमिषा प्रियाची सुटका होणार, ख्रिश्चन धर्मोपदेशकाचा दावा
22 Jul 2025
सर्पमित्रांना ओळखपत्रासह १० लाखांच्या अपघात विम्याचे कवच
25 Jul 2025
ट्रम्प बाबतच्या फतव्याने मौलवींनी जमवले ३५० कोटी
23 Jul 2025
बिहारमध्ये ५ लाख ७६ हजार नवे मतदार
19 Jul 2025
लोकमान्यांचा षष्ठ्यद्बिपूर्ती समारंभ
23 Jul 2025
चहाची निर्यात वाढली
20 Jul 2025
निमिषा प्रियाची सुटका होणार, ख्रिश्चन धर्मोपदेशकाचा दावा
22 Jul 2025
सर्पमित्रांना ओळखपत्रासह १० लाखांच्या अपघात विम्याचे कवच
25 Jul 2025
ट्रम्प बाबतच्या फतव्याने मौलवींनी जमवले ३५० कोटी
23 Jul 2025
बिहारमध्ये ५ लाख ७६ हजार नवे मतदार
19 Jul 2025
लोकमान्यांचा षष्ठ्यद्बिपूर्ती समारंभ
23 Jul 2025
चहाची निर्यात वाढली
20 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)