E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
परशुरामाच्या अहंकाराचे निर्दालन
Wrutuja pandharpure
14 Jul 2025
भावार्थ रामायणातील कथा
विलास सूर्यकांत अत्रे
सीतेच्या विवाहासाठी ठेवलेला ‘पण‘ रामाने जिंकला. तथापी अयोध्येत याची गंधवार्ताही नव्हती. या विवाहासाठी त्यांना आमंत्रण देण्यासाठी जनकाने त्याच्या प्रधानाला पाठविले. जनकाचा प्रधान ही आनंदाची बातमी घेऊन अयोध्येत पोचला. दशरथाच्या दरबारात आल्यावर त्याने राम जानकीच्या विवाहाची आनंदवार्ता सांगितली. दशरथाला रामाची सुवार्ता समजली. या निमंत्रणामुळे रामाची भेटही घडणार होती. दशरथाला परमानंद झाला.
मिथिलेस जाण्याची तयारी सुरू झाली. दाग-दागिन्यांनी सजून, उंची वस्त्रे लेवून, भरपूर द्रव्यादी घेऊन दशरथ, त्याच्या राण्यांसह, भरत व शत्रुघ्न यांना घेऊन ससैन्य प्रजाजन तसेच वसिष्ठ, वामदेव, कश्यप, मार्कंडेय, जाबाली, कात्यायन अशा अनेक थोर ऋषीमुनीनांही घेऊन निघाला. कोणी सजविलेल्या हत्ती, घोडे, उंट यावर स्वार होते, तर कोणी सजविलेल्या पालख्यांमध्ये बसून मिथिलेस जाण्यास निघाले. मिथिला नगरी त्यांच्या स्वागतासाठी सजलेली होती. स्वागतासाठी जनक सोबत त्याचे प्रधान, मंत्री, प्रतिष्ठित नगरजन यांना घेऊन जनक आलेल्या पाहुण्यांना सामोरा गेला.
जनकाने दशरथाला अलिंगन देत त्याचे स्वागत केले. दशरथाचे स्वागत करत असताना त्याच्या बाजूला भरत आणि शत्रुघ्न उभे होते. भरत आणि शत्रुघ्न यांना पाहून जनकाला आणि त्याच्या प्रधानाला विस्मय झाला. त्यांना भरत आणि शत्रुघ्न हे दोघे राम व लक्ष्मणच वाटले होते. जनकाच्या मनात आले अरे आत्ता तर हे राम-लक्ष्मण विश्वामित्राच्या सेवेत त्यांच्या निवासस्थानी होते. ते असे अचानक इथे कसे आले? आपली नगरी सोडून ते का आले? हे रुसले असतील का? उद्विग्न झालेल्या जनकाने घाबरत घाबरत वसिष्ठांकडे चौकशी केली. त्यावर वसिष्ठ हसायला लागले. वसिष्ठांनी जनकाला सांगितले की, ‘अरे हे राम-लक्ष्मण नाहीत. ते भरत आणि शत्रुघ्न आहेत. भरत हा रामपिंडाचा अर्धाभाग आहे. म्हणून तो रामासारखा दिसतो, तर शत्रुघ्न हा सौमित्राचा अर्धाभाग आहे. म्हणून तो लक्ष्मणासारखा दिसतो’. वसिष्ठांचे शब्द पूर्ण होत असतानाच विश्वामित्र राम-लक्ष्मण यांना घेऊन आले. समोर राम-लक्ष्मण आणि तसेच हुबेहुब दिसणारे बाजूला उभे असलेले भरत आणि शत्रुघ्न यांना पाहून जनकाला विस्मय वाटला.
विवाह सोहळा
कुशध्वज हा जनकाचा कनिष्ठ भाऊ. कुशध्वजाला दोन सुंदर मुली होत्या. भरत आणि शत्रुघ्न यांना पाहून जनकाला कुशध्वजाची आठवण झाली. त्याच्या मनात आले, की त्या दोघी भरत आणि शत्रुघ्न यांना द्याव्यात, तर उर्मिलेचा विवाह लक्ष्मणाबरोबर लावावा. म्हणजे दशरथाची चारही मुले हे आपले जामात होतील. जनकाने लगेचच संकशा नगरीचा राजा असलेल्या कुशध्वजला मनातील उद्देश सांगून तातडीने बोलावून घेतले. कुशध्वज निरोप मिळताच मिथिलेला आला.
जनकाच्या दोन मुलींपैकी सीता ही रामाला, तर उर्मिला ही लक्ष्मणाला द्यावी तर कुशध्वजाच्या दोन मुलींपैकी मांडवी ही भरताला आणि श्रुतकीर्ती ही शत्रुघ्न याला द्यावी, असा मानस असल्याचे जनकाने दशरथाला सांगितले. तिथे असलेल्या ऋषीमुनींना प्रतिष्ठितांना ही सोयरीक योग्य वाटली. वसिष्ठ आणि विश्वामित्र यांनी या जनकाच्या इच्छेला अनुमती दिली आणि दशरथाने जनकाचे म्हणणे स्वीकारले. जनकाने आणि त्याची पत्नी सुमेधा यांनी मोठ्या थाटामाटात ही लग्ने लावून दिली. विवाहानंतर जनकाने आणि सुमेधा यांनी सगळ्या वर्हाडाची आनंदाने बोळवण केली. दशरथ आपल्या चार मुले, नवीन चार सुनांसह सगळा कुटुंब कबिला घेऊन अयोध्येला परत निघाला.
सगळे मार्गस्थ झाले खरे, पण अचानक तास पक्षी उजवीकडून डावीकडे उडत गेले, तर कावळे डावीकडून उजवीकडे उडत गेले. मोराची पिसे गळताना दिसली. कोल्ह्याची कोल्हेकुई कानावर पडली. वाटेवर साप आणि मुंगुस यांचे युद्ध चाललेले दिसले, असे सगळे अपशकुन घडू लागले. लेकीसुनांना घरी घेऊन निघालेला दशरथ त्याला मोठी काळजी वाटू लागली. खरेतर हे शकुन, अपशकुन मर्त्य मानवाला. रामासारख्या अवतारी पुरुषाला त्याचे काय? मात्र काहीतरी विपरीत घडणार आहे याची चुटपुट दशरथाला लागून राहिली.
परशुराम प्रकटला
वसिष्ठ त्रिकालज्ञानी होते. भयभीत झालेल्या दशरथाने या अपशकुनांचा अर्थ आणि मनात येणार्या शंका याची त्यांच्याकडे विचारणा केली. वसिष्ठांनी दशरथाला सांगितले की, ‘दशरथा काळजी करू नकोस. समोर विघ्न येणार आहे, पण आपल्या सोबत राम आहे. त्यामुळे येणार्या विघ्नांचा आपल्याला त्रास होणार नाही. इथे युद्ध तर होणार आहे. चांगले घनघोर युद्ध होणार आहे, पण त्या युद्धात रामाचाच विजय आहे‘. वसिष्ठांच्या शब्दांनी दशरथाला आश्वासित केले. वसिष्ठ आणि दशरथ यांचे बोलणे चालू असतानाच मोठी वावटळ उठली. त्याने सारे आकाश व्यापून टाकले. भीती वाटावी अशी ती वावटळ होती. त्या वावटळीतून भयंकर अशी हाक ऐकू आली. त्या आवाजाने दशरथ घाबरून गेला, पण मोठ्या धैर्याचा राम मात्र शांत होता. डोक्यावर जटा, खांद्यावर परशु, हातात धनुष्यबाण असलेला, तेजस्वी असा त्या वावटळीतून विजेप्रमाणे परशुराम प्रगट झाला. परशुरामाने रामाला युद्धाचे आव्हान दिले. परशुराम रामाच्या जवळ आला. एक श्रीराम तर दुसरा परशुराम. दोघेही अवतारी पुरुष. एका विष्णूचे अवतार. रामाशी युद्ध करायला परशुराम आला.
अमूल्य आत्मशक्ती
रामावर परशुरामाने विविध बाणांचा वर्षाव केला. रामाने ते सगळे तोडून टाकले; मात्र रामाने परशुरामाला एकही बाण मारला नाही. आपण सोडलेले सगळे बाण रामाने तोडल्याचे पाहून परशुरामाचा क्रोध अनावर झाला. बाणांचा परिणाम होत नाही हे पाहिल्यावर परशुरामाने रामावर दिव्यास्त्रे सोडली. रामाने त्यांचेही क्षणभरात निवारण केले; मात्र रामाने एकही अस्त्र परशुरामावर सोडले नाही. परशुरामाने निर्वाणशस्त्रे रामावर सोडली. रामाने त्याचेही निवारण केले. तरीही रामाने प्रतिहल्ला केला नाही. परशुरामाकडे रेणुकेने दिलेल्या काळी आणि कराळी या दोन अमूल्य आत्मशक्ती होत्या. रामाच्या निर्वाणासाठी अंतिम अस्त्र म्हणून परशुरामाने त्या दोनही आत्मशक्ती रामावर सोडल्या. त्या शक्ती रामापाशी आल्या. रामाला पहाताच त्या रामाला शरण गेल्या. परशुरामाच्या अस्त्रांचे निवारण करताना रामाने कोणत्याही शस्त्राचे परशुरामावर प्रक्षेपण केले नव्हते. परशुरामाने विचार केला, रामापुढे माझे काही चालेनासे झाले आहे, ज्या माझ्या शक्ती, शत्रूचे निर्वाण करून माझ्याकडे परत यायच्या, त्या रामाच्या भात्यात जाऊन बसल्या. त्या मला सोडून रामालाच साह्य करत्या झाल्या.
परशुराम मनोमन विचार करू लागला. मी एव्हढी शस्त्रे पेरली रामाने एकही अस्त्राचा वापर माझ्यावर न करता ती सगळी निवारली. रामाकडे अस्त्रे निवारण्याची ही एव्हढीच विद्या असावी. रामाकडे अस्त्र प्रेरण्याची विद्या नसावी. माझ्यापेक्षा राम खूप उणा आहे, असे त्याला वाटले. परशुरामाने आपली भावना रामाला सांगितली. त्यावर राम नम्रपणे परशुरामाला म्हणाला की, ‘मी क्षत्रिय आहे. गाय आणि ब्राह्मण आम्हाला पूजनीय आहेत. त्यांचा स्वप्नातही माझ्या हातून घात होणार नाही. म्हणून मी तुझ्यावर वार करणार नाही‘. रामाचे शब्द एकून परशुरामाला हसू आले. तो रामाला म्हणाला की, ‘शिवाने मला दिलेल्या शिवधनुष्याचा तू भंग केलास म्हणून मला तुझा राग आला आणि मी तुझ्याशी युद्धाला आलो. तुझ्यावर टाकलेल्या सर्व अस्त्रांचे तू निवारण केलेस हे खरे. तू माझ्याशी युद्ध करीत नाहीस म्हणून मलाही तुझ्याशी युद्ध करता येत नाही. माझ्या हातात जे विष्णुचाप आहे त्याला प्रत्यंचा लावून तू धनुष्य सज्ज करून दाखव. विष्णुचापाला तू प्रत्यंचा लावलीस तर तुझ्याशी युद्ध न करता मी माझा पराभव मान्य करीन‘.
रामाने परशुरामाला सांगितले की, ‘तुला जिंकण्याची मला इच्छा नाही, पण विष्णुचापाला प्रत्यंचा लावणे ही तू केलेली आज्ञा आहे असे मी समजतो. तुझी आज्ञा मला शिरसावंद्य आहे’. असे म्हणून रामाने परशुरामाकडील विष्णुचाप हातात घेत क्षणार्धात त्याला प्रत्यंचा लावली. त्यावर बाणही सज्ज केला. रामाचा हा प्रताप बघताच परशुरामाला भीती वाटली, की शिवधनुष्याप्रमाणेच हा आता विष्णुचापाचाही भंग करणार की काय? परशुरामाने श्रीरामाचे खरे स्वरूप ओळखले. तात्काळ त्याने रामाला विनंती केली, ‘हे रामा, तुझा पराक्रम मला समजला आहे. मी तुला ओळखले आहे. विश्वात अजिंक्य असलेला मी. माझा पराभव मला मान्य आहे. कृपाकरून एक कर, शिवचापासारखा या विष्णुचापाचा भंग करू नकोस हा सज्ज केलेला बाण माघारी घे‘.
परशुरामाचे गर्वहरण
रामाने विष्णुचापावर बाण तर लावला होता. रामाने परशुरामाला विचारले ‘मी धनुष्यावर बाण सज्ज केलेला आहे. असा आरोपण केलेला बाण मला माघारी घेता येणार नाही. तो मला सोडला पाहिजे. तो आता कोणत्या लक्ष्यावर सोडू? त्यासाठी योग्य लक्ष्य ते तू सांग‘ रामाच्या मनात काय आहे हे परशुरामाने तात्काळ ओळखले.
परशुराम म्हणाला, ‘मला माझा खूप अभिमान आहे, मी महान तपस्वी, मी तीनही लोक जिंकले, मी वीर, महाशूर, मी सहस्रार्जुनाचा वध केला. या सगळ्याचा मला अहंकार झाला आहे. मी अजिंक्य आहे. मला मीपणाची बाधा आहे, ही अहंमता माझ्यात भिनलेली आहे. तुझ्या या बाणाने त्या सगळ्याचे निर्दालन कर‘. रामाच्या मनातही तेच होते. त्या बाणाने परशुरामाच्या मीपणाचे समूळ निवारण केले. त्यामुळे परशुरामाला गर्व, क्रोध यापासून मुक्ती मिळाली. त्यानंतर रामाने परशुरामाला नमस्कार केला, तर परशुरामाने रामाचा जयजयकार करीत रामाभोवती प्रदक्षिणा घालून तो स्वस्थानी निघून गेला आणि सारा लवाजमा अयोध्येकडे प्रस्थान करता झाला.
Related
Articles
‘टायगर कॉरिडॉर’च्या दृष्टिकोनातून निलगिरी महत्वपूर्ण
22 Jul 2025
अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीसाठी न्यायालयीन आयोग स्थापन करा
19 Jul 2025
मद्याच्या दुकानात दरोडा
23 Jul 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान दुरुस्तीनंतर झेपावले
23 Jul 2025
माणिकराव कोकाटे यांच्याबाबत मंगळवारी निर्णय
25 Jul 2025
लाखो रुपयांचा गुटखा जप्त
24 Jul 2025
‘टायगर कॉरिडॉर’च्या दृष्टिकोनातून निलगिरी महत्वपूर्ण
22 Jul 2025
अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीसाठी न्यायालयीन आयोग स्थापन करा
19 Jul 2025
मद्याच्या दुकानात दरोडा
23 Jul 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान दुरुस्तीनंतर झेपावले
23 Jul 2025
माणिकराव कोकाटे यांच्याबाबत मंगळवारी निर्णय
25 Jul 2025
लाखो रुपयांचा गुटखा जप्त
24 Jul 2025
‘टायगर कॉरिडॉर’च्या दृष्टिकोनातून निलगिरी महत्वपूर्ण
22 Jul 2025
अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीसाठी न्यायालयीन आयोग स्थापन करा
19 Jul 2025
मद्याच्या दुकानात दरोडा
23 Jul 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान दुरुस्तीनंतर झेपावले
23 Jul 2025
माणिकराव कोकाटे यांच्याबाबत मंगळवारी निर्णय
25 Jul 2025
लाखो रुपयांचा गुटखा जप्त
24 Jul 2025
‘टायगर कॉरिडॉर’च्या दृष्टिकोनातून निलगिरी महत्वपूर्ण
22 Jul 2025
अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीसाठी न्यायालयीन आयोग स्थापन करा
19 Jul 2025
मद्याच्या दुकानात दरोडा
23 Jul 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान दुरुस्तीनंतर झेपावले
23 Jul 2025
माणिकराव कोकाटे यांच्याबाबत मंगळवारी निर्णय
25 Jul 2025
लाखो रुपयांचा गुटखा जप्त
24 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)