राजगडच्या पायथ्याशी शिवप्रेमींचा जल्लोष   

भोर, (प्रतिनीधी) : वेल्हे तालुक्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी असलेल्या आणि त्यांच्या पराक्रमाची साक्ष देणार्‍या राजगड किल्याची नोंद युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत निवड झाली. त्या ऐतिहासिक घटनेचा जल्लोष शिवप्रेमींनी राजगड किल्याच्या पायथ्याशी केला. ढोल ताशांच्या गजरात पेढे वाटून, फटांक्यांची आतषबाजी करीत आनंद व्यक्त केला. 
 
पायथ्याशी असलेल्या खंडोबाचा माळ येथे इतिहासकालीन पोशाख परिधान करून तरूणांनी मर्दानी खेळ सादर करून महाराजांना मानवंदना दिली. यावेळी आमदार शंकर मांडेकर, प्रांताधिकारी डॉ.विकास खरात, महेश हरिश्चंद्रे, तहसीलदार निवास ढाणे, गटविकास अधिकारी संजय ढमाळ, पुरातत्व विभागाचे हरीभाऊ बारगजे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, अमोल नलावडे उपस्थित होते.यावेळी मांडेकर म्हणाले, राजगडचा युनेस्कोच्या यादीत समावेश झाला ही मोठी अभिमानाची बाब आहे. यापुढे किल्याचे संवर्धन आणि पर्यटनाच्या दृष्टीने काम केले जाईल. लवकरच किल्यावर महाराजांचा भव्य पुतळा, राजमुद्रा, भगवा ध्वज उभारण्यात येईल.

Related Articles