रायगडच्या समुद्रामध्ये पाकिस्तानी बोटीचा वावर   

संशयास्पद वस्तूमुळे खबरदारीचा इशारा

मुंबई : पाकिस्तानच्या कराची येथील एका मच्छिमार बोटीचा रायगड जिल्ह्यातील समुद्रात वावर होता, अशी माहिती उघड झाली आहे. या बोटीची जीपीएस प्रणालीवर कार्यरत असलेली आणि पाण्यात तरंगणारी एक वस्तू (मासेमारीचा बोया) समुद्रात होता. नंतर तो नुकताच समुद्र किनार्‍याला लागला होता.कोरलाई किल्ल्याजवळ शनिवारी मध्यरात्री मुकदर बोया ९९ हा दिसला होता त्यावर क्रमांकही होता, अशी माहिती भारतीय तटरक्षक दलाने पोलिस दलाला दिली होती.  यानंतर शोध मोहीम राबविण्यात आली. 
 
नंतर उघड झाले की, कराची येथील एक मासेमारी बोटीचा हा बोया आहे. गेल्या वर्षी हा ट्रान्सपाँडर असलेला हा बोया बोटीपासून विभक्त झाला होता. नंतर किल्ल्याजवळ तरंगत आला होता. दरम्यान, मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवादी हल्ला झला होता. त्या हल्ल्यापूर्वी पाकिस्तानातून आलेल्या दहा दहशतवाद्यांनी बोटीतून प्रवास केला होता. १६६ जणांचे प्राण गोळीबार करुन दहशतवाद्यांनी घेतले होते. या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा इशारा देण्यात आला आहे.
 
मासेमारीचा बोया म्हणजे काय ?
 
मासेमारीचा बोया, ज्याला मार्कर बोया किंवा फिशिंग फ्लोट असेही म्हणतात, ही एक तरंगणारी वस्तू आहे जी मच्छिमारांना समुद्रातील ठिकाणे चिन्हांकित करण्यासाठी उपयुक्त ठरतात. बोया हा पाण्यात नांगरलेली असतो. जसे की माशांचा वावर जेथे अधिक आहे. त्या ठिकाणी बोया तरंगत ठेवला जातो. ठिकाण सोडल्यानंतर तेथे पुन्हा पोचून मासेमारी करता यावी, हा त्या मागचा हेतू असतो. 

Related Articles