रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ   

ईडीकडून पुरवणी आरोपपत्र

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (एमएससीबी) गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पुरवणी आरोपपत्र  दाखल केले आहे. आर्थिक अफरातफर प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) २०२ अंतर्गत मुंबईतील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ईडीने रोहित पवार यांचा आरोपी म्हणून उल्लेख केला आहे. पवार कुटुंबीयांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने  रोहित यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरवरून ईडीने ही कारवाई केली आहे. रोहित पवार हे अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. या प्रकरणात ईडीने त्यांची दोन वेळा चौकशी केली होती. 

Related Articles