विमान अपघातातील एआयबीने दिलेला अहवाल प्राथमिक   

मुरलीधर मोहोळ यांची माहिती 

पुणे : अहमदाबाद विमान अपघात प्रकरणात एआयबीने दिलेला अहवाल हा प्राथमिक आहे. या अहवालावरून काहीच निष्कर्ष काढता येणार नाही. त्याबाबत चौकशी आणि तपासणी सुरू आहे. अंतिम अहवाल येण्यास थोडा वेळ लागणार आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतुक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शनिवारी दिली.
 
पुण्यातील एका कार्यक्रमानंतर या विमान अपघात प्रकरणातील १५ पानी अहवाल प्रसिध्द झाल्याबाबत मोहोळ यांना विचारले असता ते म्हणाले, हा प्राथमिक अहवाल आहे. आपल्याला या अहवालावर निष्कर्ष काहीच काढता येणार नाही. एआयबीनं खूप चांगलें काम केले आहे. १२ जून रोजी अपघात झाला आणि १३ जून रोजी ब्लॅक बॉक्स शोधण्यात यश आले. एक महिन्याच्या आत प्राथमिक अहवाल येणे हे आपल्या संस्थेचे यश असल्याचेही मोहोळ यांनी नमूद केले. 
 
पूर्वी एखादा अपघात झाला की ब्लॅक बॉक्स हा बाहेरच्या देशात पाठवावा लागत होता. आता आपल्या देशातच सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान असल्याने ब्लॅक्स बॉक्सची तपासणी भारतातच होत आहे. प्राथमिक अहवालात जे संभाषण समोर आले ते त्यावरून अंतीम निष्कर्ष काढता येणार नाही. पुढील तपासणी आणि चौकशी आवश्यक असून, अंतिम अहवाल येण्यास थोडा वेळ लागणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.

Related Articles