जेजुरीच्या आठ माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश   

पुणे : पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप १६ जुलै रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मात्र त्या अगोदरच प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत जेजुरी नगरपालिकेच्या ८ माजी नगरसेवकांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला.भाजपमध्ये प्रवेश करण्याचा आमचा निर्णय अगोदरच निश्चित झाला होता. त्यामुळे आम्ही भाजपमध्ये प्रवेश केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपमध्ये प्रवेश करणार्‍या माजी नगरसेवकांत जेजुरीचे माजी उपनगराध्यक्ष गणेश आगलावे, सुधीर गोडसे, राजाभाऊ पेशवे, राजेंद्र कुंभार यांच्यासह माजी नगरसेवक सतिष घाडगे, संजय खोमणे, दिलीप मोरे, महेश आगलावे या ८ जणांचा समावेश आहे. आमच्या प्रवेशाचा निर्णय अगोदरच निश्चित होता, आमच्यानंतर माजी आमदार जगताप यांच्या प्रवेशाचा निर्णय झाल्याचे या नगरसेवकांनी स्पष्ट केले आहे. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, जिल्हा भाजपचे अध्यक्ष तसेच जेजुरी आणि पंचक्रोशीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles