लालमहाल चौकात ‘शिववारसा’ गौरव आनंद सोहळा   

पुणे : छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार... चे स्वर ऐतिहासिक लाल महाल चौकात दुमदुमले आणि छत्रपती शिवरायांच्या १२ दुर्गांची नोंद युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आली. यानिमित्त शिवभक्त व शाहिरांचा ’शिववारसा’ आनंद सोहळा पार पडला. यावेळी हातात भगवे झेंडे घेऊन बालशाहिरांनी देखील उत्साहाने सहभाग घेतला.
 
श्री शिवनेरी स्मारक समिती व शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणेच्या वतीने  लालमहाल चौकात ’शिववारसा’ गौरव आनंद सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पुणेकरांना साखर वाटण्यात आली. प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, प्रा. संगीता मावळे, अरुणकुमार बाभुळगावकर, इतिहास प्रेमी तेजपाल शहा आदी उपस्थित होते.
 
आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे  म्हणाले, महाराष्ट्रातील प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. याचा आम्हाला अभिमान आहे.  हे सर्व किल्ले सतराव्या शतकात बांधले गेलेले आहेत. हे किल्ले मराठा सैन्याच्या असामान्य लष्करी व्यवस्थेचा आणि अभेद्य तटबंदीचा भक्कम पुरावा आहेत. शाहिरांनी आजपर्यंत शिवरायांच्या शौर्याची आणि या शौर्यस्थळांची कीर्ती सर्वदूर पोहोचविण्याचे कार्य केले. आता हा दर्जा मिळाल्याने साता समुद्रापार कीर्ती पोहोचणार आहे.

Related Articles