लिपिक, टंकलेखकांच्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर   

आमदार रासने यांच्या प्रयत्नांना यश

पुणे :  राज्यातील हजारो विद्यार्थी पुणे शहरात स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. मात्र, आयोगाच्या विलंबामुळे त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले जात आहे. दोन वर्षांपूर्वी गट क लिपिक व टंकलेखकांच्या सात हजार पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. परंतु अंतिम निकाल अद्यापही जाहीर झाला नसल्याची बाब कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून विधानसभेत मांडली. यानंतर अवघ्या काही तासांमध्ये या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आल्याने सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. 
 
हेमंत रासने यांनी एमपीएससीच्या कारभारावर बोट ठेवत परीक्षांचे निकाल वेळेत लागत नाहीत, पात्रता यादी वेळेत जाहीर होत नाही, परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, मानसिक आणि आर्थिक नुकसान होते. चझडउ ला निकालासाठी बंधनकारक कालमर्यादा द्यावी, उत्तरदायित्व निश्चित करणारी स्वतंत्र समिती किंवा लोकपाल नेमावा, विद्यार्थ्यांसाठी मानसशास्त्र व कायदेविषयक सल्ला देणारे केंद्र स्थापन करावे, अशी मागणी विधानसभा सभागृहात केली होती.
 
यावेळी न्यायालयाने या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात कोणतीही अडचण नसल्याचे नुकतेच सांगितले असून निकालाची प्रत येताच परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल, अशी माहिती राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली होती. यानंतर शासन यंत्रणा तातडीने कामाला लागून गट क लिपिक व टंकलेखक परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. 

Related Articles