पिंपरी : एका फायनान्स कंपनीकडून लिलावात विकत घेतलेला फ्लॅट आहे असे खोटे सांगून तो फ्लॅट खरेदी करून देत असल्याचे भासवून तिघांनी मिळून एकाची २७ लाख ५० हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना रावेत येथे घडली. याप्रकरणी लक्ष्मण विश्वनाथ रणवरे (वय ४५, काळेवाडी) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार धनंजय खुशालचंद्र बोरा (वय ४५, विठ्ठलनगर, शिरूर), संजय शामराव रणवरे (वय ४७, काळेवाडी), अनिल रघुनाथ शेवाळे (वय ४५, गोल्ड काउंटी, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांना रावेत येथील फ्लॅट एयु फायनान्स कंपनीकडूुन लिलावात विकत घेतल्याचे खोटे सांगितले. तो फ्लॅट फिर्यादी यांना खरेदी करून देतो असे भासविले. आरोपी अनिल याने एयु फायनान्स कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगितले. आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून २७ लाख ५० हजार घेत फसवणूक केली.
Fans
Followers