पिंपरी : आम्ही इथले भाई आहोत. आमच्या नादाला तुम्ही लागू नका, असे म्हणत रस्त्याकडेला लावलेल्या दोन बस आणि इतर गाड्यांच्या काचा फोडल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना गुरूवारी रात्री पिंपरीतील साधु वासवाणी उद्यानासमोर घडली. याप्रकरणी घनशाम त्रिलोकनाथ गुप्ता (वय ३४, वैभवनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्वराज गणेश पानकडे (वय १९), आशिष राजेंद्र जाधव (वय २५), शिवराज भाऊसाहेब खोसे (वय २२, सर्व रा. पिंपळेनिलख), सुशांत महादेव शेंडगे (वय २३, पिंपळेगुरव) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच आणखी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांनी त्यांच्या मालकीच्या दोन बस रस्त्याच्या कडेला लावल्या होते. आरोपींनी लाकडी दांडके व दगडाने दोन्ही बसच्या काचा फोडल्या. यासंदर्भात फिर्यादी यांनी जाब विचारला असता आरोपींनी त्यांना मारहाण करून जखमी केले. तसेच बससोबतच अन्य गाड्यांच्याही काचा फोडून हातातील दांडके हवेत फिरवून आम्ही इथले भाई आहोत. आमच्या नादाला तुम्ही लागू नका, असे म्हणत परिसरात दहशत निर्माण केली.
Fans
Followers