रहाटणी मधील अनधिकृत बांधकामावर कारवाई   

पिंपरी : ’ग’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्र. २७ येथील नखाते वस्ती रहाटणी फाटा रस्ता, रहाटणी येथील अंदाजे क्षेत्रफळ १२०० चौ. फूट. या अनधिकृत आरसीसी (तळमजला + दोन मजले) (२ वाढीव मजले) या बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. ही कारवाई आयुक्त शेखर सिंह यांचे निर्देशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  ’ग’ क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे यांच्या अधिपत्याखाली तसेच उप अभियंता अहिरे, महापालिका धडक कारवाई पथकातील वीट निरिक्षक किरण पवार, सौरभ शिरसाठ,  विनोद बजवळकर, व मितुष सावंत तसेच अतिक्रमण निरिक्षक मनिष जगताप यांचे मार्फत व एम.एस.एफ. जवान १८, पोलिस निरीक्षक २, पोलिस कर्मचारी १२, मनपा मजूर १०, ठेकेदार मजूर १५ व जेसीबी ब्रेकर ०२, ट्रॅक्टर ब्रेकर ०२ तसेच १० हातोडे यांचे सहाय्याने करण्यात आली.

Related Articles