मनसेची कायदा आघाडीच भाजपमध्ये सामील   

पिंपरी : आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न  काटे यांनी मनसेला   मोठा धक्का दिला आहे. मनसेच्या जनहित व विधी कायदा सेलच्या शहराध्यक्षा ड. प्रीतिसिंह परदेशी यांनी आपल्या संपूर्ण कायदा सेलच्या पदाधिकार्‍यांसह  भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अ‍ॅड. परदेशी यांच्यासमवेत मनसे कायदा सेलचे पदाधिकारी अ‍ॅड. श्रीधर यलमार,अ‍ॅड. रुचिरा कर्वे, अ‍ॅड. विद्या राठोड, अ‍ॅड. श्रुती जोगळेकर, अ‍ॅड. अमोल वाघ, आणि ड. रोहन देशपांडे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
 
या पक्षप्रवेश सोहळ्याला युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, भाजप राज्य परिषद सदस्य पाटीलबुवा चिंचवडे, हनुमंत लांडगे, प्राधिकरणचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजप प्रदेश सदस्य ड. मोरेश्वर शेडगे, महेश कुलकर्णी, शहर सरचिटणीस शैला मोळक, महिला मोर्चा शहराध्यक्ष सुजाता पालांडे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मनोज ब्राह्मणकर, युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अजित कुलथे, भटके-विमुक्त आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष कैलास सानप, कायदा आघाडीचे शहराध्यक्ष ड. गोरक्षनाथ झोळ यांच्यासह शिवराज लांडगे, राजाभाऊ मासुळकर, दिनेश यादव, हरिभाऊ चिंचवडे, प्रवीण कुंजीर, बाळासाहेब परघळे, दीपक गांगुर्डे, आदित्य काटे आदी  उपस्थित होते.

Related Articles