E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
यानिक सिनरला अंतिम सामन्यात कार्लोस अल्काराझचे आव्हान
Wrutuja pandharpure
13 Jul 2025
लंडन
: विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज यानिक सिन्नर याला कार्लोस अल्कराझ याचे आव्हान असणार आहे. हा सामना आज रात्री ८.३० वाजता रंगणार आहे. या प्रतिष्ठेच्या सामन्यात बाजी मारत या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविणार हे लवकरच समजेल. हे दोन्ही युवा टेनिसपटू हे विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कशी कामगिरी करतात यावर सर्वांचे लक्ष्य असणार आहे. या अंतिम सामन्यात कार्लोस अल्कराझ याचे पारडे जड आहे. मात्र सिन्नर चिकाटीमुळे अंतिम फेरीत पोहचला आहे. त्यामुळे हा अंतिम सामना अत्यंत चुरशीचा होणार आहे.
याआधी झालेल्या दुसर्या उपांत्यफेरीच्या सामन्यामध्ये इटलीचा अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू यानिक सिनर याने विक्रमी ग्रँडस्लॅम जिंकण्याचे स्वप्न घेऊन कोर्टवर उतरलेल्या नोव्हाक जोकोविचला मोठा धक्का दिला आहे. अवघ्या २३ वर्षीय यानिक सिनरने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत जोकोविचला सरळ सेटमध्ये (६-३, ६-३, ६-४) पराभूत करत पहिल्यांदाच विम्बल्डनचा अंतिम सामना गाठण्याचा डाव साधला. सात वेळचा विम्बल्डन चॅम्पिनयन आणि आतापर्यंतच्या कारकिर्दीत २४ वेळा ग्रँडस्लम स्पर्धा गाजवणार्या नोव्हाक जोकोविचसमोर सिनरने सर्वोत्तम खेळ केला.जोकोचा प्रत्येक प्रयत्न हाणून पाडत ब्लॉकबस्टर होईल, अशी लढत त्याने एकतर्फी केली. आता जेतेपदासाठी अंतिम सामन्यात सिनरसमोर गत चॅम्पियन आणि टेनिस जगतातील दुसर्या स्थानी असलेल्या कार्लोस अल्काराझचे आव्हान असेल. यानिक सिनर याने या लढतीत जबरदस्त सुरुवात करताना पहिल्या दोन सेटमध्ये नोव्हाक जोकोविचला बॅकफूटवर ढकलले.
कमालीचा वेग अन् ताकदीनं फटके मारत इटालियन टेनिसपटूने सर्बियन स्टारला पहिल्या दोन सेटमध्ये ६-३, ६-३ असे मागे टाकले. यानिक सिनरनं पहिल्या दोन सेटमध्ये दाखवलेला खेळ पाहता जोकोविचसाठी हा सामना अधिक आव्हानात्मक झाला होता. मेडिकल टाइम आउटनंतर जोकोविच याने दमदार कमबॅक करत तिसर्या सेटमध्ये आघाडी मिळवली. पण यानिक सिनर याने या सेटमध्ये पुन्हा ३-३ बरोबरी साधत जोकोविचसमोर पुन्हा आव्हान निर्माण केले. शेवटी हा सेट ६-४ असा जिंकत त्याने मॅच आपल्या नावे केली. ३८ वर्षीय नोव्हाक जोकोविच याने आतापर्यंत ७ वेळा विम्बल्डन स्पर्धा जिंकली आहे. आठव्यांदा ही स्पर्धा जिंकून रोजर फेडरची बरोबरी करण्यासोबतच विक्रमी २५ व्या ग्रँडस्लॅमवर नाव कोरण्याची संधी त्याच्याकडे होती. हे स्वप्न घेऊनच तो या स्पर्धेत उतरला होता. पण हे स्वप्न इटालीयन टेनिस स्टारने धुळीस मिळवले.
Related
Articles
व्हॉट्सऍप कट्टा
19 Jul 2025
मग गुन्हेगार कोण? (अग्रलेख)
23 Jul 2025
अमेरिकेच्या व्यापार कराराच्या जाळ्यात अडकू नका
25 Jul 2025
सौदी अरेबियाच्या ‘स्लीपिंग प्रिन्स’चे निधन
21 Jul 2025
आंबेगाव तालुक्यात खवय्यांकडून १ लाख कोंबड्या आणि ५ टन मटण फस्त
25 Jul 2025
पाकिस्तानात पावसाच्या बळींची संख्या २०० वर
21 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
19 Jul 2025
मग गुन्हेगार कोण? (अग्रलेख)
23 Jul 2025
अमेरिकेच्या व्यापार कराराच्या जाळ्यात अडकू नका
25 Jul 2025
सौदी अरेबियाच्या ‘स्लीपिंग प्रिन्स’चे निधन
21 Jul 2025
आंबेगाव तालुक्यात खवय्यांकडून १ लाख कोंबड्या आणि ५ टन मटण फस्त
25 Jul 2025
पाकिस्तानात पावसाच्या बळींची संख्या २०० वर
21 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
19 Jul 2025
मग गुन्हेगार कोण? (अग्रलेख)
23 Jul 2025
अमेरिकेच्या व्यापार कराराच्या जाळ्यात अडकू नका
25 Jul 2025
सौदी अरेबियाच्या ‘स्लीपिंग प्रिन्स’चे निधन
21 Jul 2025
आंबेगाव तालुक्यात खवय्यांकडून १ लाख कोंबड्या आणि ५ टन मटण फस्त
25 Jul 2025
पाकिस्तानात पावसाच्या बळींची संख्या २०० वर
21 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
19 Jul 2025
मग गुन्हेगार कोण? (अग्रलेख)
23 Jul 2025
अमेरिकेच्या व्यापार कराराच्या जाळ्यात अडकू नका
25 Jul 2025
सौदी अरेबियाच्या ‘स्लीपिंग प्रिन्स’चे निधन
21 Jul 2025
आंबेगाव तालुक्यात खवय्यांकडून १ लाख कोंबड्या आणि ५ टन मटण फस्त
25 Jul 2025
पाकिस्तानात पावसाच्या बळींची संख्या २०० वर
21 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)