केएल राहुलचे संयमी शतक   

लॉर्ड्स : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसर्‍या कसोटी सामन्याचा थरार सुरू आहे. या सामन्यात सलामीला आलेल्या केएल राहुलने दमदार शतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने लॉर्ड्सच्या मैदानावरील मोठा विक्रम आपल्या नावावर केला त्याच्या या कामगिरीमुळे भारतीय संघाने ३८७ धावा केल्या. आणि इंग्लंडच्या पहिल्या डावातील धावसंख्येशी बरोबरी केली. यावेळी रवींद्र जडेजा (७२) आणि पंत (७४) यांनी भारतासाठी अर्धशतकी कामगिरी केली. 
 
मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये केएल राहुलने भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील दुसर्‍या डावात त्याने दमदार शतक झळकावलं होतं. आता लॉर्ड्स कसोटीतील पहिल्या डावात भारतीय संघाला गरज असताना, केएल राहुलने आपले शतक पूर्ण केले आहे. हे लॉर्ड्सच्या मैदानावरील त्याचे दुसरे शतक ठरले आहे. केएल राहुल इंग्लंडमध्ये फलंदाजी करताना ४ शतकं झळकावणारा पहिलाच भारतीय सलामीवीर फलंदाज ठरला आहे. यासह लॉर्ड्सच्या मैदानावर डावाची सुरूवात करताना २ शतकं झळकावणारा तो पहिलाच भारतीय सलामीवीर फलंदाज ठरला आहे.
 
केएल राहुल सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. या फॉर्मचा फायदा घेत त्यने या मालिकेतील दुसरं शतक झळकावलं आहे. तसेच लॉर्ड्सच्या मैदानावर खेळताना त्याचं हे दुसरं शतक ठरलं आहे. भारतीय संघाच्या पहिल्या डावातील ६७ व्या डावात केएल राहुलने १०० धावांचा पल्ला गाठला. भारतीय संघाला सुरूवातीला मोठे धक्के बसले होते. यशस्वी जैस्वाल, करूण नायर आणि कर्णधार शुबमन गिल स्वस्तात माघारी परतले होते. पण केएल राहुलने न डगमगता एक बाजू धरून ठेवली आणि भारतीय संघाला २५० धावांच्या पार पोहोचवलं. यादरम्यान त्याने ऋषभ पंतसोबत मिळून १०० धावांची भागीदारी केली.
 
संक्षिप्त धावसंख्या : भारत ( पहिला डाव) : राहुल १००, जैस्वाल १३, पंत ७४, जडेजा ७२, करूण नायर ४०, गिल १६, नितीश रेड्डी ३०, वॉशिंटन सुंदर २३, आकाशदीप ७, सिराज ०, एकूण : ११९.२ षटकांत ३८७/१०

Related Articles