आयुष म्हात्रेचे अर्धशतक   

बकिंगहॅम :भारताचा १९ वर्षाखालील संघही इंग्लंड दौर्‍यावर आहे. या संघात एक नाव सध्या सगळीकडे चर्चेत आहे, १४ वर्षांचा वैभव सूर्यवंशी. एकदिवसाच्या सामन्यांच्या मालिकेत त्याने इंग्लिश गोलंदाजांची जबरदस्त धुलाई करत धमाकेदार खेळ केला होता. आता सर्वांच्या नजरा कसोटी मालिकेकडे लागल्या आहेत. कसोटी मालिकेतील पहिला सामना बकिंगहॅममध्ये खेळला जात आहे. मात्र वैभव सूर्यवंशी पहिल्या डावात फारशी कमाल दाखवू शकला नाही. 
 
मात्र दुसरीकडे भारत १९ वर्षाखालील संघाचा कर्णधार आयुष म्हात्रेने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. यासोबत विहान मल्होत्रासोबत त्याने १०० धावांची भागीदारी केली आहे. मल्होत्रा दरम्यान चौकार शोधण्याचा प्रयत्न करत आहे, पण अर्धशतक पूर्ण केल्यावर म्हात्रेने गोलंदाजांवर हल्ला चढवायचा निर्णय घेतलाय. कर्णधार आयुष म्हात्रेने आतापर्यंत ८ चौकार आणि २ षटकार मारले आहे आणि ६९ धावांवर खेळत आहे. वनडेमध्ये काहीसा शांत असलेला म्हात्रे इथे जोरदार खेळ दाखवतो. वैभवने टेस्ट सामन्याची सुरुवात त्याच्या आक्रमक शैलीत केली. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारत त्याने खाते उघडले. त्यानंतर आणखी दोन चौकार लगावत त्याने जोरदार सुरुवात केली, पण एलेक्स ग्रीनच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. 

Related Articles