सिराजने वाहिली डिओगो जोटाला श्रद्धांजली   

लॉर्ड्स :भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणार्‍या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसर्‍या दिवशी भारताचा वेगवान गोलंदाज  सिराजने दुसर्‍या सत्रात जेमी स्मिथची विकेट घेतली तेव्हा त्याने वेगळ्या पद्धतीने सेलीब्रेशन केले. हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. सिराजने आता बीसीसीआयने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये त्याच्या सेलिब्रेशनमागील कारण सांगितले आहे.
लिव्हरपूलकडून खेळणारा पोर्तुगालचा स्टार फुटबॉल खेळाडू डिओगो जोटा याचे ३ जुलै रोजी कार अपघातात निधन झाले. त्याच्या निधानाची बातमी कळताच संपूर्ण जग हादरून गेले. सिराजसाठीही हा मोठा धक्का होता. लॉर्ड्स मैदानावर खेळण्यात आलेल्या कसोटी सामन्यातील दुसर्‍या दिवशी सिराजने स्मिथची विकेट घेतल्यानंतर आकाशाकडे पाहिले आणि आपल्या बोटाने २० क्रमांकाचा इशारा केला. सिराजने आपल्या इशार्‍यातून डिओगो जोटाला श्रद्धांजली वाहिली.

Related Articles