सरे (कॅनडा) : विनोदी कलाकार कपिल शर्मा यांच्या कॅनडातील सरे येथील कॅफेवर गोळीबार झाला. काही दिवसांपूर्वीच कॅफेचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर गोळीबाराची घटना घडली असून तपास पोलिसांनी सुरू केला आहे. गुरुवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. तेव्हा कर्मचारी कॅफेत होते. त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. गोळीबार का झाला ? याचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे. दरम्यान, संशयिताची ओळख पटलेली नाही. तसेच गोळीबाराचे कारण अस्पष्ट आहे.
Fans
Followers