तामिळनाडूत बाँबस्फोटातील तीन दहशतवाद्यांना अटक   

चेन्नई : तामिळनाडू दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करून बाँबस्फोटातील तीन संशयित दहशतवाद्यांना अटक केली. गेल्या काही महिन्यांपासून त्याला पकडण्यासाठी तीन राज्यांच्या पोलिसांनी मोहीम राबविली होती. त्या मोहिमेला यश आल्याचे पोलिस महासंचालकांनी सांगितले.
 
अबुबकर सिद्दिकी, महमद अली आणि सादीक ऊर्फ टेलर राजा, अशी संशयित दहशतवाद्यांची नावे आहे. गेल्या तीन दशकांपासून ते पोलिसांना गुंगारा देत आले होते. त्यांना पकडण्यासठी अरम आणि अगाझी या नावाची मोहीम आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूच्या पोलिसांनी संयुक्तपणे राबविली. १९९८ मध्ये कोईमत्तूरमध्ये साखळी बाँबस्फोट झाले होते. त्यात ५८ जणांचा मृत्यू आणि २५० जखमी झाले होते. २०१३ मध्ये बंगळुरू येथील मल्लेश्वरम येथे बाँबस्फोट झाला होता. या प्रकरणातील वरील तीन संशयित आरोपी आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम गेली सहा महिने राबविली होती. त्यापैकी सिद्दिकी आणि अली यांना आंध्र प्रदेशातील कडप्पातून, साादीक याला कर्नाटकातील विजापूर येथून अटक केली. दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करून तपास सुरू केला आहे.
 
अटक केलेले संशयित किराणा मालाचे, टेलर दुकान आणि बांधकाम व्यवसाय करत होते. त्यांची ओळख पटविण्याचे काम कित्येक वर्षे सुरू होेते. अखेर ताब्यात घेतल्यानंतर ओळख पटविण्यात अधिक यश आल्याचे पोलिस महासंचालक शंंकर जीवाल यांंनी सांगितले.
 

Related Articles