आमची सीमा तिबेटसोबत;चीनशी काहीच संबंध नाही   

अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी खडसावले

नवी दिल्ली : आमची सीमा तिबेटसोबत आहे. चीनसोबत ती नाही, अशा शब्दांत अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी चीनला खडसावले आहे. अरुणाचल प्रदेश चीनचा भूभाग असल्याचा दावा खोडून काढताना खांडू म्हणाले, अरुणाचल प्रदेशाला चीन दक्षिण तिबेट असे संबोधत आहे. ही बाब भारताने अनेकदा अमान्य केली आहे. वास्तविक आमची सीमा चीनसोबत कुठेच नाही. ती केवळ तिबेटसोबत आहे. चीनने दावा केला होता की, सुमारे १ हजार २०० किलोमीटरची सीमा अरुणाचल प्रदेशासोबत आहे. तो दावा खोडून काढताना पेमा खांडू यांनी स्पष्ट केले की, अरुणाल प्रदेशाची सीमा तिबेटसोबत असून ती चीनसोबत कधीच नव्हती. १९५० मध्ये चीनने तिबेट बेकायदा गिळंकृत केला. कार्यालयीन दृष्ट्या तिबेटवर चीनचे वर्चस्व असल्याचे आम्ही मानत नाही. कारण पूर्वीपासून आमची सीमा तिबेटसोबत होती. 
 
अरुणाचल प्रदेशाशी संलग्न तीन आतंरराष्ट्रीय सीमा आहेत. त्यात भूतानसोबत १५० किलोमीटरची, म्यानमारसोबत ५५० किलोमीटरची आणि तिसरी तिबेटसोबतची आहे. ही सीमा सर्वाधिक लांबीची आहे. ते म्हणाले, अरुणाल प्रदेशावर दावा करून लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडचा भूभाग ताब्यात घेण्याचे कारस्थान चीन रचत असल्याचा आरोप त्यांनी केला.
 

Related Articles