धरण क्षेत्रातील अतिक्रमणे काढण्यासाठी ड्रोनद्वारे पाहणी   

मुंबई : लघु सिंचन प्रकल्पांमध्ये साचलेला गाळ काढण्यासाठी मृद व जलसंधारण विभागामार्फत ’गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही योजना राबविण्यात येते. याचबरोबर धरण क्षेत्रातील अतिक्रमणे काढण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून याची ड्रोनच्या माध्यमातून पाहणी करण्यात येत असल्याची माहिती जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली.
 
डॉ. मनीषा कायंदे यांनी तलावांच्या स्वच्छतेसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना विखे-पाटील बोलत होते. या चर्चेत शशिकांत शिंदे यांनी सहभाग घेतला.
 
विखे म्हणाले, लोकसहभागातून राबविण्यात येणार्‍या ’गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना गाळ वाहून नेण्यासाठी १५ हजारांच्या मर्यादेत प्रति घनमीटर ३५.७५ रुपयांचा निधी जिल्हाधिकार्‍यांच्या मार्फत दिला जातो. गाळ काढण्यासाठी यांत्रिकी विभागाकडील यंत्रसामग्रीचा प्रभावी वापर करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
 

Related Articles