E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
आंबेनळी घाटात दरड कोसळली
Samruddhi Dhayagude
12 Jul 2025
महाबळेश्वर-पोलादपूर मार्ग बंद; दरड हटविण्याचे काम सुरू
सातारा, (वार्ताहर) : जिल्ह्यात पावसाची पूर्ण उघडीप असली तरी महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात दरड कोसळली आहे. यामुळे दरड हटविण्याचे काम वेगाने सुरू असले तरी पाच दिवस मार्ग बंद राहण्याची शक्यता आहे. परिणामी वाहतूक विस्कळीत होणार असल्याने वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.
महाबळेश्वर-पोलादपूर हा मार्ग कोकणला जोडणारा आहे. या मार्गावरील आंबेनळी घाटात दरड कोसळली आहे. यामुळे दरड हटविली जात आहे. परिणामी पाच दिवस मार्ग बंद राहणार असल्याने पर्यायी मार्गाचा अवलंब करावा करावा लागणार आहे. तसेच पश्चिमेकडीलच बुरडाणी, कोट्रोशी, दोडाणी, उचाट रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात दरड कोसळलेली आहे. पोकलेन आणि ब्लास्टिंगच्या साहाय्याने दरड हटविण्यात येऊ लागली आहे. त्यामुळे रस्ता बंद आहे. दरड हटविल्यानंतर रस्ता वाहतुकीस खुला होणार आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात तीन आठवडे धुमाकूळ घालणार्या पावसाने दोन दिवसांपासून ब्रेक घेतला आहे. त्यामुळे पश्चिम भागातील कास, तापोळा, बामणोली, कोयना, नवजा, महाबळेश्वरसह संपूर्ण कांदाटी आणि कोयना खोर्यात पाऊस थांबल्यातच जमा आहे. यामुळे अनेक दिवसानंतर पश्चिम भागातील लोकांनाही सूर्यदर्शन होऊ लागले आहे. तसेच शेतीची कामे आणि भात लागणीलाही वेग येणार आहे. त्यातच शुक्रवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे फक्त ८ मिलिमीटरची नोंद झालेली आहे. तर नवजा येथे २१ आणि महाबळेश्वरला १६ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयना येथे २ हजार १५५, नवजाला १ हजार ९४८ आणि महाबळेश्वरला २ हजार १३ मिलिमीटर पाऊस पडला आहे. पश्चिम भागात पावसाची उघडीप असली तरी धरणात पाण्याची आवक सुरूच आहे. कोयना धरणात येणार्या पाण्याची आवक मंदावली असली तरी साठा ७२.५१ टीएमसी झाला होता. सुमारे ६९ टक्के धरण भरले आहे. तर पायथा वीजगृहाची दोन युनिटस् सुरू असून त्यातून २ हजार १०० क्यूसेक विसर्ग सुरूच आहे.
पश्चिम भागातच धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी ही प्रमुख धरणे आहेत. या धरणक्षेत्रातही पावसाची उघडीप आहे. तरीही धरणात पाण्याची आवक असल्याने साठा वाढू लागला आहे. तर सातारा शहरात दोन दिवसांपासून पावसाची उघडीप कायम आहे.
Related
Articles
विधानसभेचा आखाडा का होत आहे?
23 Jul 2025
सुनील गावसकरांची आयसीसीच्या ’कन्कशन सब्स्टीट्यूट’ नियमावर सडकून टीका
26 Jul 2025
पुरुष विभागात सतेज संघ,महिला विभागात राजमाता जिजाऊ विजेता
24 Jul 2025
‘ऑपरेशन सिंदूर’वर पुढील आठवड्यात संसदेत चर्चा
24 Jul 2025
राष्ट्रवादीच्या आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा
24 Jul 2025
अंशुल कंबोजला भारतीय संघात स्थान
21 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर