लॉर्ड्समध्ये सचिन तेंडूलकर यांच्या छायाचित्राचे अनावरण   

लॉर्ड्स : भारत आणि इंग्लंडमधील तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर खेळला जात आहे.  भारत आणि इंग्लंडमधील मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. लॉर्ड्सवरील तिसर्‍या कसोटीत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
 
त्याआधी भारतीय क्रिकेटचे दैवत सचिन तेंडुलकरच्या पोट्रेटचे अनावरण लॉर्ड्सवरील एमसीसी संग्रहालयात करण्यात आले. हे पोट्रेट नामवंत कलाकार स्टुअर्ट पिअर्सन राईट यांनी काढले आहे. ते यावर्षीच्या अखेरीपर्यंत संग्रहालयात राहणार आहे. त्यानंतर ते पॅव्हेलियनमध्ये हलवले जाणार आहे.
एमसीसी संग्रहात असलेले हे पाचवे भारतीय खेळाडूंचे पोट्रेट आहे.त्यातील चार (कपिल देव, बिशन सिंग बेदी, दिलीप वेंगसरकर आणि तेंडुलकर) ही पोट्रेट राईट यांनीच काढली आहेत. 
 
लॉर्ड्समध्ये पोट्रेटचे अनावरण झाल्यानंतर सचिन तेंडुलकर म्हणाला की,  मी पहिल्यांदा लहान वयात १९८८ साली लॉर्ड्सला आलो होतो. १९८९ मध्ये स्टार क्रिकेट क्लबच्या टीमसोबत पुन्हा तिथे जाण्याची संधी मिळाली. आणि तेव्हा पॅव्हिलियनजवळ उभा राहून या ऐतिहासिक जागेचं दर्शन घेत होतो आणि मनात शांतपणे मोठी स्वप्नं पाहत होतो. पुढे तो म्हणाला, आज, त्याच ठिकाणी माझं चित्र अनावरण होत आहे, हे क्षण शब्दांत मांडणं खूप कठीण आहे. असं वाटतंय, आयुष्य एक सुंदर फेरी पूर्ण करून परत इथेच आले. मन भरून आले आणि मनापासून आभार मानतो.
 

Related Articles