युनेस्को वारसा स्थळ यादीसाठी गड, किल्ल्यांच्या नामांकनांची तपासणी   

नवी दिल्ली : मराठा साम्राज्यातील लष्करीदृष्ट्या महत्वाच्या मानल्या जाणाार्‍या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांसह जगभरातील ३० स्थानांचा समावेश युनेस्कोच्या वारसा स्थळाच्या यादीत  केला जाणार आहे. त्यासाठी पाठवलेल्या नामांकनांची तपासणी सुरू झाली आहे.
 
युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीकडून नामांकनाची तपासणीं केली जात आहे. त्यात युनोस्कोने घोषित केलेल्या दोन स्थळांच्या सीमांबाबत फेरआढावा घेतला जात आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे जागतिक वारसा समितीचे ४७ वे सत्रास  ८ जुलैपासून प्रारंभ झाला आहे. ते १६ जुर्लैपर्यंत सुरू राहणार आहे. ११ ते १३ जुलै अखेर एकूण ३२ ठिकाणांंची समितीकडून तपासणी केली जात आहे. 
 
मराठा साम्राज्यातील लष्करीदृष्ट्या महत्वाच्या १२ किल्ल्यांना नामांकन दिले आहे. त्यामध्ये साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि जिंजीचा किल्ला यांचा समावेश आहे. या सर्व किल्ल्यांचे भौगलिक स्थान आणि भौतिक रचनेत विविधता आहे. लष्करीदृष्ट्या त्यांना महत्व होेते, असे भारतीय अधिकार्‍यांनी सांंगितले.  १७ ते १९ व्या शतकात किल्ल्यांची निर्मिती झाली होती. ती मराठा साम्राज्याची शक्तिस्थाने होती. दरम्यान, ऑपरेशनल मार्गदर्शक तत्त्वे- २०२३ नुसार नामांकन चक्रासाठी राज्य पक्षाकडून फक्त एकच कागदपत्र सादर केले जाऊ शकते.
 

Related Articles