तृणमूल काँग्रेसच्या नेत्याची हत्या   

कोलकाता : पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात  तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याची हत्या गुरुवारी रात्री करण्यात आली. ते आमदाराचे  निकटवर्तीय होते. हत्येमुळे शुक्रवारी परिसरात तणाव निर्माण झाला होता.
 
राज्जाक खान, असे नेत्याचे नाव आहे. ते कनिंग पूर्वचे आमदार साकोट मुल्ला यांचे निकटवर्तीय होते. पक्षाची बैठक भांगर परिसरात आयोजित केली होती. तृणमूलचे प्रदेशाध्यक्ष चलतबेरीया यांच्यासोबत खान यांनी चर्चा केली आणि ते घरी परतत होते. तेव्हा त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. तसेच हल्लेखोरांनी त्यांच्यावर चाकूने वारही केले होते. गंभीर जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे ज्येष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी दिली. यानंतर परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. मृतदेह पुढील तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. 

Related Articles