निकोबारच्या समुद्रातून दोन खलाशांची सुटका   

नवी दिल्ली : भारतीय तटरक्षक दलाने अंदमान निकोबारच्या इंदिरा पॉइंट परिसरात समुद्रात यांत्रिक बिघाड झाल्यामुळे हेलकावे खात असलेल्या एका नौकेतून दोन खलाशांची शुक्रवारी सुटका केली.
 
सी अँजेल, असे नौकेचे नाव आहे. अंदमान निकोबरच्या वायव्येला इंदिरा पॉइंट आहे. त्या परिसरातील समुद्रात एका नौकेत बिघाड झाला. त्यामुळे खलाशी नौकेत अडकले होते. तटरक्षक दलाला याबाबतची माहिती १० जुलै रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मिळाली होती. अमेरिकेचा आणि तुर्कीचे असे दोन खलाशी नौकेत होते. खराब हवामान आणि यांत्रिक बिघाडामुळे नौकेचा प्रवास थांबला होता. अखेर गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तटरक्षक दलाने नौकैवर ताबा मिळविला. ११ जुलै रोजी सकाळी आठ वाजता कँम्पबेल बे परिसरात ती जहाजाच्या माध्यमातून ओढून आणली.

Related Articles