नेपाळ-चीन सीमेवरील पुरात नऊ जणांचा मृत्यू; १९ बेपत्ता   

काठमांडू : चीनमध्ये सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नेपाळमधील भोटेकोशी नदीला पूर आला. नेपाळ आणि चीनला जोडणारा मैत्री पूल पुरामुळे वाहून गेला. पुरात आतापर्यंत किमान नऊ जणांचा मृत्यू झाला असून, १९ जण बेपत्ता आहेत. 
 
राष्ट्रीय आपत्ती जोखीम आणि व्यवस्थापन प्राधिकरणाचे महासंचालक दिनेश भट्ट म्हणाले, काठमांडूच्या १२० किमी ईशान्येकडील रसुवा जिल्ह्याच्या काही भागात मंगळवारी आलेल्या अचानक आलेल्या पुरामुळे मितेरी पूल, रसुवागढी जलविद्युत प्रकल्प आणि नेपाळ-चीन सीमेजवळ असलेल्या कोरड्या बंदराच्या काही भागांचे पूर्णपणे नुकसान झाले. मंगळवारी पहाटे ३ च्या सुमारास आलेल्या पुरात मितेरी पूल वाहून गेला. यावेळी पुलावर २३ मालवाहू कंटेनर, सहा मालमोटारी आणि ३५ इलेक्ट्रिक वाहने वाहून नेली. आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे, एक जण जखमी झाला आहे. १९ जण बेपत्ता आहेत आणि ५७ जणांना वाचवण्यात आले आहे. 
 
नेपाळ सरकारने पुरात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. बेपत्ता नागरिकांमध्ये सहा चिनी नागरिक आणि तीन पोलिसांचा समावेश आहे.दरम्यान, पुरामुळे जिल्ह्यातील चार जलविद्युत प्रकल्पांचे नुकसान झाले, ज्यामुळे राष्ट्रीय वीज ग्रीडला किमान २११ मेगावॅट वीज पुरवठ्यावर परिणाम झाला.

Related Articles