ऑनलाइन फसवणूक; पाकिस्तानात ७१ परदेशी नागरिकांना अटक   

इस्लामाबाद : ऑनलाइन फसवणुकीविरोधात पाकिस्तानच्या सायबर गुन्हे अन्वेषण संस्थेने ४८ चिनी नागरिकांसह ७१ परदेशी नागरिकांना अटक केली आहे. परदेशी बँकिंग यंत्रणा हॅक करण्यात आणि सायबर गुन्ह्यात सहभागी असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
 
पंजाब प्रांतातील फैसलाबाद शहरात एका कॉल सेंटरवर छापा टाकला आणि १५० लोकांना ताब्यात घेतले. त्यामध्ये चीनमधील ४४ पुरुष आणि चार महिला, नायजेरियातील तीन पुरुष आणि पाच महिला, फिलिपाइन्सचे तीन, श्रीलंकेचे दोन, बांगलादेशचे सहा, झिम्बाब्वेचा एक आणि म्यानमारमधील दोन महिलांचा समावेश आहे.
 
एका माजी वरिष्ठ सरकारी अधिकार्‍याच्या मालकीचे हे कॉल सेंटर आहे. या कॉल सेंटरमधील कर्मचार्‍यांनी सर्वसामान्य नागरिकांना गंडा घालून लाखोंची फसवणूक केली आहे. छाप्यादरम्यान अधिकार्‍यांनी लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत. इलेक्ट्रॉनिक गुन्हे प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित कलमांखाली संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Related Articles