कॅनडात विमान अपघात भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिकाचा मृत्यू   

ओटावा : कॅनडाच्या मॅनिटोबा प्रांतात झालेल्या विमान अपघातात एका भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिकाचा मृत्यू झाला, असे टोरंटोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने सांगितले.मंगळवारी सकाळी स्टेनबाख साउथ विमानतळाजवळील हरव्स एअर पायलट स्कूलच्या धावपट्टीपासून ४०० मीटर अंतरावर हा अपघात घडला. यात मूळचा केरळचा रहिवासी श्रीहरी सुकेश (२२) आणि त्याची कॅनडीयन वर्गमैत्रीण साव्हाना मे रॉयेस (२०) हिचा मृत्यू झाला. दोघेही एकाच प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी होते.
 
भारतीय वंशाच्या श्रीहरीने याआधीच खासगी वैमानिक परवाना मिळवला होता आणि आता व्यावसायिक वैमानिक परवाना घेण्यासाठी प्रशिक्षण घेत होता. टेकऑफ आणि लँडिंगचा सराव करत असताना लँडिंग स्ट्रिपजवळ येताना  विमान धडकले.

Related Articles