काँग्रेस आमदाराच्या घरावर छापा   

बंगळुरु : कर्नाटक काँग्रेसचे आमदार एस.एन. सुब्बा रेड्डी आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी छापे घातले. परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या (फेमा) कलम ३७ अंतर्गत ही कारवाई सुरू आहे, असे सूत्रांनी सांगितले.
 
या प्रकरणात रेड्डी आणि त्यांचे कुटुंबीय ईडीच्या रडारवर आहेत. रेड्डी यांच्या निवासस्थानासह बंगळुरुतील पाच ठिकाणांवर ईडीच्या पथकाने एकाच वेळी कारवाई केली. रेड्डी यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांवरही छापासत्र सुरू आहे, असे सूत्रांनी सांगितले.
 
रेड्डी आणि त्यांच्या कुटुंबीयांची परदेशात अघोषित संपत्ती आहे. विशेषतः मलेशिया, हाँगकाँग, जर्मनीमध्ये रेड्डी कुटुंबीयांनी मोठी गुंतवणूक केली आहे. यात स्थावर मालमत्ता आणि वाहनांचा समावेश आहे. रेड्डी हे चिक्काबल्लापुरा जिल्ह्यातील बागेपल्ली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते काँग्रेसच्या तिकिटावर तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

Related Articles