अहमदाबाद : निवृत्तीनंतर मी राहिलेले आयुष्य नैसर्गिक शेती करण्यात तसेच वेद आणि उपनिषद वाचण्यात घालवणार आहे. नैसर्गिक शेती हा एक प्रकारचा वैज्ञानिक प्रयोग आहे, जो अनेक प्रकारचे फायदे देतो. म्हणून मी आजही नैसर्गिक शेतीच पिकवतो, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. अहमदाबादमध्ये एका कार्यक्रमात बोलताना शाह म्हणाले, कृत्रिम खतांच्या मदतीने उगवलेला गहू खाऊन कर्करोग होतो, रक्तदाब वाढतो, मधुमेह होतो, थायरॉईड होतो. खाणार्याचे शरीर चांगले राखण्यासाठी शुद्ध, सात्त्विक खाणे गरजेचे आहे, त्यामुळे औषधांची गरजच भासणार नाही. नैसर्गिक शेतीमुळे उत्पादनही वाढते.
Fans
Followers