अनधिकृत बांधकामे नोटीस देऊन पाडणार   

मुंबई : पुणे शहरातील विशेषतः गुरुवार पेठ परिसरात बांधकामे करून त्याआधारे अनधिकृत शेड उभारली गेली आहेत. त्यामुळे ज्या बांधकामांना अधिकृत परवानग्या नाहीत, अशा बांधकामांची तातडीने सुनावणी घेऊन ती पाडण्याचे आदेश दिले जातील, असे उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले.योगेश टिळेकर यांनी लक्षवेधीद्वारे पुणे शहरातील अनधिकृत बांधकामासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. या लक्षवेधीदरम्यान सदाभाऊ खोत, अभिजित वंजारी यांनीही सहभाग घेतला.
 
सामंत म्हणाले की, जी बांधकामे धार्मिक स्थळांच्या बाबतीत अधिकृत आहेत. त्यांच्यावर मात्र कारवाई होणार नाही. जी अनधिकृत बांधकामे आहेत, त्यांच्यावर कारवाई होईल. तसेच ज्या अधिकार्‍यांनी अनधिकृत बांधकामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, त्या अधिकार्‍यांचीही चौकशी केली जाईल, असेही सामंत यांनी सांगितले.

Related Articles