डिंभे धरण ६८.०८ टक्के भरले   

मंचर, (प्रतिनिधी) : आंबेगाव तालुक्यातील हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरण गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यत ६८.०८ टक्के भरले असून पावसाचे सातत्य राहिल्यास धरण १०० टक्के भरण्यासाठी वेळ लागणार नाही, असे जलसंपदाचे उपविभागीय अधिकारी दत्ता कोकणे यांनी सांगितले.
 
यावर्षी मे महिन्यापासून जवळपास दररोज पाऊस कोसळत होता. आजूबाजूच्या परिसरातून पाण्याचा प्रवाह धरणामध्ये सुरू झाला आहे. त्यामुळे धरणाच्या साठ्यात लक्षणीय वाढ होत आहे. त्यात सध्या पश्चिम आदिवासी भागात पावसाचा जोर वाढत राहिल्याने धरण ६८.०८ टक्के भरले आहे. 
 
डिंभे धरणाचा फायदा आंबेगाव तालुक्यातील पूर्वेकडील गावांना, शिरूर, जुन्नर तालुका आणि  अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील सत्तरहून अधिक गावातील शेती पिकांना उन्हाळ्यात होत असतो. धरणातील पाण्यामुळे आंबेगाव तालुका शेती उत्पादनात सुजलाम सुफलाम झाला आहे.
 

Related Articles