E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
हिंजवडीकरांच्या समस्या सोडविण्यासाठी नियोजनाचा बृहत आराखडा सादर करा
Samruddhi Dhayagude
11 Jul 2025
फडणवीस यांचे आदेश
मुंबई : पुण्यातील हिंजवडी ‘आयटी’ पार्क परिसरातील वाहतूक कोंडी, पूरस्थिती तसेच पिण्याच्या पाण्यासह सर्व समस्या सोडविण्यासाठी पुणे ‘मनपा’, पिंपरी चिंचवड ‘मनपा’, पुणे महानगर विकास प्राधिकरण आणि ‘एमआयडीसी’ने योग्य समन्वयाने नियोजन करावे. उपलब्ध संसाधनाद्वारे नागरिकांना चांगली सेवा देण्यास प्राधान्य द्यावे. विविध समस्यांवर तोडगा काढून कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी बृहत आराखडा सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
हिंजवडी ‘आयटी’ पार्कमधील विविध समस्यांबाबत विधानभवनमध्ये आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार शंकर जगताप, शंकर मांडेकर, महेश लांडगे, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता, प्रधान सचिव गोविंदराज, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे मनपा आयुक्त नवलकिशोर राम, पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त शेखर सिंह, पुणे महानगर विकास प्राधिकरण आयुक्त योगेश म्हसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उद्योग विकास आयुक्त पी. वेलारासू यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, हिंजवडी येथील रहिवासी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडीमुळे हजारो आयटी अभियंते, नागरिक त्रस्त झाले आहेत. पावसाळ्यात वाहतूक कोंडीत भर पडते ही समस्या सोडविण्यासाठी या भागांत रस्ते, रिंगरोड, उड्डाणपूल, सार्वजनिक वाहतूक, पार्किंग यंत्रणा, मेट्रोची प्रलंबित कामे मार्गी लागण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या. कस्पटेवस्ती ते हिंजवडी फेज ३ पर्यंतचा रस्ता वेगळा केल्यास वाहतूक कोंडी कमी होईल, सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे करावेत. म्हाळुंगे आयटी सीटीचा प्रस्ताव त्वरित मंजूर करावा.
रस्ता रुंदीकरणाच्या कामांना प्राधान्य द्यावे
सूर्या हॉस्पिटल ते माण गावठाण, म्हाळुंग ते हिंजवडी फेज एक, शनि मंदिर वाकड ते मरूनजी, नांदे ते माण या रस्त्यांच्या रूंदीकरणाच्या कामाला संबंधित यंत्रणांनी प्राधान्य द्यावे. शिवाजीनगर ते हिंजवडी कॉरिडॉरचा आराखडा तयार करावा. वाकड-बालेवाडी भागात सार्वजनिक वाहतूक केंद्र उभारावे, यामुळे प्रवासी विभागले जावून गर्दी नियंत्रणात राहील. रस्त्यावरील गर्दी रोखता येईल. यासाठी फूटपाथचा विषयी दोन्ही ‘मनपा’ने प्राधान्याने मार्गी लावावा. पाटीलवस्ती ते बालेवाडीरोड येथील भूसंपादनाबाबत महिनाभरात काम करावे, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
मेट्रोचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करा : उपमुख्यमंत्री पवार
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भक्कम झाली तर हिंजवडी परिसरातील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. यासाठी मेट्रोची कामेही त्वरित होणे आवश्यक आहे. मेट्रो स्टेशनची कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. मेट्रो लँडिंगमुळे रस्ता छोटा होईल, यासाठी एमआयडीसी, पीएमआरडीए, मेट्रो यांनी एकत्र समन्वयाने विषय मार्गी लावावा, असे निर्देशही पवार यांनी दिले.
Related
Articles
हुंड्यासाठीच वैष्णवीवर अत्याचार
20 Jul 2025
समान पाणीपुरवठा योजनेचे वाचणार १ हजार कोटी
25 Jul 2025
निमिषा प्रियाची सुटका होणार, ख्रिश्चन धर्मोपदेशकाचा दावा
22 Jul 2025
दाल में कुछ काला है !
24 Jul 2025
पाकिस्तानात खैबर पख्तूनख्वामध्ये सात पोलिस बेपत्ता
21 Jul 2025
लॉस एंजेलिसमध्ये गर्दीत मोटार घुसली, ३० जण जखमी
21 Jul 2025
हुंड्यासाठीच वैष्णवीवर अत्याचार
20 Jul 2025
समान पाणीपुरवठा योजनेचे वाचणार १ हजार कोटी
25 Jul 2025
निमिषा प्रियाची सुटका होणार, ख्रिश्चन धर्मोपदेशकाचा दावा
22 Jul 2025
दाल में कुछ काला है !
24 Jul 2025
पाकिस्तानात खैबर पख्तूनख्वामध्ये सात पोलिस बेपत्ता
21 Jul 2025
लॉस एंजेलिसमध्ये गर्दीत मोटार घुसली, ३० जण जखमी
21 Jul 2025
हुंड्यासाठीच वैष्णवीवर अत्याचार
20 Jul 2025
समान पाणीपुरवठा योजनेचे वाचणार १ हजार कोटी
25 Jul 2025
निमिषा प्रियाची सुटका होणार, ख्रिश्चन धर्मोपदेशकाचा दावा
22 Jul 2025
दाल में कुछ काला है !
24 Jul 2025
पाकिस्तानात खैबर पख्तूनख्वामध्ये सात पोलिस बेपत्ता
21 Jul 2025
लॉस एंजेलिसमध्ये गर्दीत मोटार घुसली, ३० जण जखमी
21 Jul 2025
हुंड्यासाठीच वैष्णवीवर अत्याचार
20 Jul 2025
समान पाणीपुरवठा योजनेचे वाचणार १ हजार कोटी
25 Jul 2025
निमिषा प्रियाची सुटका होणार, ख्रिश्चन धर्मोपदेशकाचा दावा
22 Jul 2025
दाल में कुछ काला है !
24 Jul 2025
पाकिस्तानात खैबर पख्तूनख्वामध्ये सात पोलिस बेपत्ता
21 Jul 2025
लॉस एंजेलिसमध्ये गर्दीत मोटार घुसली, ३० जण जखमी
21 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
बाजारात खोबर्याचा तुटवडा
5
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
6
टीआरएफ आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना