अधिवेशन सुरू असताना एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत   

मुंबई : मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत पोहोचले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौर्‍याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांदरम्यान त्यांचा दिल्ली दौरा नेमका कशासाठी आहे, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.  एकनाथ शिंदे बुधवारी रात्री अचानक दिल्लीत दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शिंदे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी दिल्लीत आल्याची माहिती आहे. त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असल्याचे समजते. मात्र या भेटीबाबत अधिकृत कारण अद्याप समजलेले नाही.
 
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे,तर खासदार श्रीकांत शिंदे तसेच शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाठ यांना आयकर विभागाची नोटीस आल्याची चर्चा आहे, त्यासाठी शिंदे अचानक दिल्लीत गेल्याचे बोलले जात आहे. राज आणि उद्धव ठाकरे मराठी एकत्र आले आहेत, त्यातच मीरा रोड येथील मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एकत्र आले आहेत, ठाकरे बंधू एकत्र आल्यापासून शिंदे गटात अस्वस्थता आहे, मिरा रोड येथे मराठी भाषिकांच्या मोर्चेच्या वेळी शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांना हुसकावूल लावण्यात आले, शिंदे सेनेच्या विरोधात कुठेतरी  राज्यातील राजकीय  वातावरण तयार होत असताना शिंदे यांनी अधिवेशन सुरू असताना अचानक दिल्ली गाठणे महत्वाचे समजले जात आहे.
 

Related Articles