नाशिक -मुंबई महामार्गावर भीषण अपघात   

४ जणांचा जागीच मृत्यू

मुंबई : नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. मुंढेगाव फाट्याजवळ मालमोटार मोटारीवर उलटली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश असून, सर्वजण मुंबईतील अंधेरी येथील रहिवासी होते. गुरूपौर्णिमेनिमित्त प्रवासी मठात गेले होते.दरम्यान, दर्शन घेऊन परतीच्या प्रवासादरम्यान वाहनाचा अपघात झाला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई येथील अंधेरीतील रहिवासी गुरूपौर्णिमेनिमित्त मुंढेगाव फाट्याजवळील रामदास बाबांच्या मठात गेले होते. दर्शन घेऊन झाल्यानंतर त्यांनी पुन्हा मुंबईकडे परतीचा प्रवास करत होते. मात्र, अंधेरी गाठण्यापूर्वी त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात घडला. मुंढेगाव फाट्यावर त्यांच्या मोटारीवर अचानक सिमेंट पावडरचा मालमोटार कोसळला.या भीषण अपघातात मोटार सिमेंट पावडरच्या मालमोटारीखाली दबली गेली आणि मालमोटार पुढे फरपटत गेली. अपघात एवढा भीषण होता की, सर्वजण मोटारीच्या आतील भागात दबले गेले. 

Related Articles