मुंबईत ४७ लाखांचे अमलीपदार्थ जप्त   

नऊ जणांना अटक

मुंबई : नवी मुंबईत ४७ लाख रुपये किमतीचे हेरॉइन जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सीबीडी बेलापूर परिसरात सापळा रचला आणि पंजाबमधील तरनतारन येथील दोन रहिवाशांना अटक केली. या दोघांची चौकशीनंतर हेरॉइन विक्री करणार्‍या टोळीच्या इतर पाच जणांनाही अटक करण्यात आली. या कारवाईत एकूण १२० ग्रॅम हेरॉइन जप्त करण्यात आले आहे, त्याची किंमत अंदाजे ४७ लाख रुपये आहे.

Related Articles