लॉर्डसच्या मैदानात सचिन तेंडुलकरचा सन्मान   

लॉर्ड्स : क्रिकेटची पंढरी समजल्या जाणार्‍या लॉर्ड्सच्या मैदानात भारत-इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या ऐतिहासिक मैदानातील परंपरेनुसार, मास्टर सचिन तेंडुलकरनं घंटा वाजवल्यावर सामना सुरु करण्याची घोषणा केली.भारत-इंग्लंड यांच्यातील द्विपक्षीय मालिकेला अँडरसन-तेंडुलकर या दोन दिग्गजांचे नाव देण्यात आले आहे. याशिवाय लॉर्ड्सच्या मैदानातील सामन्याआधी क्रिकेटच्या देवाचा अर्थात सचिन तेंडुलकरचा खास सन्मान करण्यात आला.
 
लॉर्ड्स स्टेडियममध्ये रंगलेल्या सामन्याआधी सचिन तेंडुलकरनं एमसीसी म्यूझ्यियमलाही भेट दिली. या म्यूझियममध्ये भिंतीवर सचिन तेंडुलकरचा फोटो लावण्यात आला आहे. खुद्द सचिनच्या हस्ते या फोटोचे अनावरण करण्यात आले. लॉर्ड्समध्ये लावण्यात आलेल्या सचिनच्या खास फ्रेमच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी सचिनसह चउउ चे चेयरमन मार्क निकोलसही उपस्थितीत होते.
 
बीसीसीआयने या खास क्षणाचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले आहेत. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक स्टेडियमरील कसोटी सामन्यासाठी सचिन तेंडुलकर पत्नी अंजली तेंडुलकरसोबत ततखझ स्टँडमध्ये बसल्याचेही स्पॉट झाले. 1988 मध्ये मी पहिल्यांदा लॉर्ड्सला भेट दिली आणि १९८९ मध्ये स्टार क्रिकेट क्लब संघातून खेळलो. मला आजही आठवते की, त्यावेळी मी पॅव्हेलियनजवळ उभा राहून इतिहासात रमलो होतो. आज, याच ठिकाणी माझे पोर्ट्रेट अनावरण झाले. या भावना शब्दात व्यक्त करणे कठीण आहे, अशी भावूक पोस्टही सचिन तेंडुलरनं शेअर केली आहे.

Related Articles