दिल्ली: देशाची राजधानी दिल्ली येथे आज सकाळी ९.०४ च्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. ४.१ रिश्टर स्केलच्या तीव्रतेने हा भूकंप झाला. भूकंपाचे धक्के सुमारे १० सेकंद जाणवले. दिल्ली एनसीआर हरियाणातील जिंद आणि बहादुरगडमधील लोकांना हे धक्के जाणवले.नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (एनसीएस) नुसार, भूकंपाचे केंद्र झज्जरच्या उत्तरेस १० किलोमीटर अंतरावर होते.
Fans
Followers